कोरोनावर हा असा उपाय नकोच........याला वाटंय की, तो काहीही करु शकतो
भारतात सर्वाधिक रुग्ण असल्याचे देखील समोर आले आहे. अशात लोकं मास्क लावणे, सोशल डिस्टंसींग पाळणे, लसीकरण करणे या सगळ्या गोष्टींवर भर देत आहे.
मदुराई : जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे, त्यात भारतात सर्वाधिक रुग्ण असल्याचे देखील समोर आले आहे. अशात लोकं मास्क लावणे, सोशल डिस्टंसींग पाळणे, लसीकरण करणे या सगळ्या गोष्टींवर भर देत आहे. तर काही जण आपआपल्या पद्धतीने कोरोनापासून वाचण्यासाठी उपाय करत आहेत. परंतु तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने कोरोनापासून वाचण्यासाठी जो काय उपाय काढला आहे, तो ऐकून तुम्हाला याची किळस येईल.
तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात राहणारा 50 वर्षीय वादिवेलु (Vadivelu) एग्रीकल्चर कुली (Agriculture Coolie) आहे. याचा असा दावा आहे की, विषारी साप जिवंत खाल्ल्याने कोरोनाचा संसर्ग टाळता येतो. आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी ,वादिवेलुनी एक साप खाऊन देखील दाखवला. तेव्हापासून याबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरु आहे. या व्यक्तीच्या या धोकादायक कृत्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि त्याला दंडही ठोठावला आहे. त्यानंतर या व्हीडिला सोशल मीडियावरुनही हटवण्यात आले आहे.
परंतु हा जिवंत आणि विषारी साप खाऊन देखील वादिवेलूला काही झाले नाही, हे त्याचे नशीबच समजावे लागेल. एका माहितीनुसार त्याने सापाच्या विषारी ग्रंथींचा चावा घेतला नाही. जर वादिवेलुने सापाच्या विषारी ग्रंथींना चावले असते, मग त्याचे काही खरे नव्हते. असेही म्हटले जात आहे की, ही विचित्र गोष्ट करतांना वादिवेलुने मद्यपान केले. म्हणून त्याने ही धोकादायक गोष्ट केली होती. नाहीतर असा जिवंत साप खाण्याची हिंमत कोणीच करु शकणार नाही.
वादिवेलु तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील पेरुमलपट्टी गावचा रहिवासी आहे. त्याने नंतर पोलिसांना सांगितले की, त्याने एका सापाला शेतात पकडले होते. त्यानेतर त्यांने त्याला खाण्याआधीच ठार मारले होते. वन्यजीव अधिकार्यांनी हा व्हायरल व्हीडिओ पाहिल्यानंतर या घटनेबद्दल दु: ख व्यक्त केले आहे त्यांने असेही वक्तव्य केले की, अशा प्रकारच्या कार्यात सहभागी होणे खूपच हानिकारक ठरु शकते. त्यामुऴे कोणीही ही गोष्ट करु नका आणि कोणत्याही अन्य अंधश्रद्धेला बळी पडू नका.