नवी दिल्ली : लग्नात सासरच्यांकडून नवरदेवाला गिफ्ट दिलं जातं. कुणी आलिशान कार देतं तर कुणी सामान देतं. मात्र, एका नवरदेवाला असं काही गिफ्ट दिलं आहे जे पाहिल्यानंतर तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का...


गिफ्टची सर्वत्र होतेय जोरदार चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणातील फतेहाबादमध्ये नुकताच एक विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात मुलीच्या नातेवाईकांनी आपल्या जावयाला दिलेल्या गिफ्टची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. 


या लग्नात नवरदेवाला गिफ्ट म्हणून चक्क माकड दिला आहे. हे गिफ्ट मिळाल्यामुळे नवरदेव नाराज झाला नाही तर अत्यंत आनंदी आहे आणि त्यामागे एक खास कारणही आहे.


... म्हणून आनंदी आहे नवरदेव


फतेहाबादमधील टोहाना येथील निवासी असलेल्या संजय पूनिया याचं डवानाखेडा येथील रितु सोबत लग्न ठरलं. ठरल्याप्रमाणे दोघांचा लग्नसोहळा ११ फेब्रुवारी रोजी पार पडला. या लग्नात मुलीच्या नातेवाईकांनी संजयला गिफ्ट म्हणून माकड दिला. संजयही गेल्या काही दिवसांपासून माकड खरेदी करण्याचा विचार करत होता आणि त्यातच त्याला हे गिफ्ट मिळाल्याने तो खूप आनंदी आहे.



संजयने सांगितले की, त्याच्याकडे म्हैस आहेत तसेच पावने दोन एकर परिसरात चारा आहे. मात्र, नेहमी त्या ठिकाणी माकडं येतात आणि चारा घेऊन जातात. त्यासाठी तेथे एक कामगार ठेवला जो माकडांना चारा घेऊन जाण्यापासून रोखेल मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही.


या संपूर्ण घटनेची माहिती मुलीच्या सासरच्या लोकांनाही होती. त्यामुळे त्यांनी संजयला माकड गिफ्ट देण्याचं ठरवलं.


आता हा माकड आल्याने त्यांच्या शेतात येणारी इतर माकडं कमी झाली आहेत. त्यामुळे संजय खूपच आनंदी आहे.