तरुणाने लावून दिले बायकोचे प्रियकराशी लग्न
सहा दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते मात्र आपली पत्नीचे दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम आहे हे त्याला कळले. सत्य समजल्यानंतर त्याने पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले आणि आनंदाने तिची पाठवणी केली. असे काहीसे तुम्ही सिनेमात पाहिले असेल.
मुंबई : सहा दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते मात्र आपली पत्नीचे दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम आहे हे त्याला कळले. सत्य समजल्यानंतर त्याने पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले आणि आनंदाने तिची पाठवणी केली. असे काहीसे तुम्ही सिनेमात पाहिले असेल.
मात्र हे खरे घडलेय. राऊरकेला मध्ये असे प्रकरण समोर आलेय. येथील एका युवकाने लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांत पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले आणि धामधुमीत तिची पाठवणी केली.
सुंदरगड जिल्ह्यातील वडगाव ब्लॉकमधील पमारा गावमध्ये हे अनोखे लग्न पाहायला मिळाले. या गावात राहणाऱ्या २८ वर्षीय़ वासुदेव टप्पूचे लग्न देविनी गावांत राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीशी झाले होते.
रितीरिवाजाप्रमाणे ४ मार्चला हा विवाह झाला. मात्र लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांतच टप्पूला आपल्या पत्नीचे मर्जीविरुद्ध लग्न झाल्याचे समजले. तसेच तिचा प्रियकरही तिला भेटण्यासाठी आल्याचे समजले. यावेळी टप्पूने बायकोचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्याचे ठरवले. यावेळी टप्पूच्या घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला मात्र त्यानंतर हा विरोध मावळला आणि सगळे तयार झाले.
यानंतर टप्पूच्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी धामधुमीत लग्न लावून देत तिची पाठवणी कऱण्यात आली. टप्पूने उचललेल्या या पाऊलाचे सर्वांनीच कौतुक केले. टप्पू म्हणाला, जर मी असे केले नसते तर तिघांचे आयुष्य खराब झाले असते. त्यामुळेच हा निर्णय घेतला. आता मी खुश आहे.