Car Rams Into Salon: सलूनमध्ये वेटिंगवर असतानाच त्याला मृत्यूनं गाठलं; अंगावर काटा आणणारा Video
Car Rams Into Salon Video Viral: या व्हिडीओमध्ये पाच व्यक्ती दिसत असून त्यापैकी एका व्यक्तीचा या भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला दुकानात शिरलेल्या कारने चिरडलं.
Car Rams Into Salon Video Viral: सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात. त्यामुळे या माध्यमांवर कधी कोणता व्हिडीओ नेमक्या कोणत्या कारणासाठी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अनेक व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही असं होतं. तर काही व्हिडीओ अगदीच अंगावर काटा आणणारे असतात. असे व्हिडीओ पाहून खरोखरच धक्का बसतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये अचानक एका व्यक्तीचा धक्कादायक अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याच सीसीटीव्हीचं हे फुटेज व्हायरल झालं आहे.
दुकानात बसलेला असताना मृत्यू
रस्ते अपघातापासून सुरक्षित राहण्यासाठी अनेकजण काळजी घेत असतात. अगदी गाडी चालवण्यापासून ते रस्त्यावर चालतानाही अनेकजण काळजी घेतात. काही जण वेगावर बंधन घालतात तर रस्ता क्रॉस करतानाही अनेकजण फारच सतर्क असतात. मात्र रस्त्याच्याकडेला असलेल्या एखाद्या दुकानात बसल्या बसल्या अचानक मृत्यूने गाठलं तर? तसं हे वाक्य ऐकून असं कसं काय शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र एका व्हायरल व्हिडीओमध्ये पक्क्या दुकानामध्ये बसलेल्या एका व्यक्तीचा अचानक झालेल्या विचित्र अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला.
एका सलूनमधील व्हिडीओ
व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका सलूनमधील आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक दिस आहे. एखाद्या सामान्य सलूनमध्ये असते तसेच दृष्य सीसीटीव्हीच्या या कॅमेरामधील व्हिडीओत दिसत आहे. दोन लोक ग्राहकांचे केस कापताना व्हिडीओत दिसतात. एवढ्यात अचानक एक मोठ्या आकाराची कार या छोट्याश्या दुकानामध्ये घुसते. प्रचंड वेगाने ही गाडी दुकानाचा पुढील भाग तोडून आतमध्ये प्रवेश करते. या गाडीचा वेग इतका प्रचंड असतो की दुकानाच्या पुढील भागा असलेल्या काचा आणि बांधकामाला धडक दिल्यानंतरही ती संपूर्ण गाडी या दुकानात घुसते. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये आपला क्रमांक येण्याची वाट पाहत असलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी चढत असल्याचं दिसतं.
अचनाक गाडी आली अन्...
व्हिडीओमध्ये पाच लोक दिसत असून दोन ग्राहक, दोन केस कापणाऱ्यांबरोबरच बाकड्यावर बसलेली एक व्यक्तीही या ठिकाणी दिसत आहे. अचानक या लोकांना दुकानाच्या बाहेरुन आवाज येतो. सर्वजण दुकानाच्या प्रवेशद्वाराकडे पाहतात. व्हिडीओ पाहता त्यांना कसला तरी आवाज आल्यासारखं वाटतं. दोन्ही ग्राहक आपल्या खुर्च्यांवरुन उठून उभे राहतात. तर बाकड्यावरील व्यक्ती दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जागेवरुन उठतो अन् तितक्यात गाडी दुकानाच्या प्रवेशद्वारामधून आजमध्ये घुसते. ही गाडी या बाकड्यावर बसलेल्या व्यक्तीला चिरडते.
हा व्हिडीओ व्हिशिएस व्हिडीओज नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.