नवी दिल्ली : पंजाबच्या तरनतारण येथील सरहदी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका साध्याशा कारणावरून एका मुलाने आपल्या आई व भावाची हत्या केली आहे.


नेमके काय झाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडबड, गोंधळ करू नका, असे आई मुलांना सांगत असता त्याचा राग आल्याने त्या मुलाने हे पाऊल उचलले. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यानंतर ते कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार...


डीएसपी सुलखन सिंग यांनी सांगितले की, आरोपी साहिब सिंगच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याला दोन मुलं आहे. त्या मुलांना त्याची आई बलविंदर सांभाळत होती. शुक्रवारी दोन्ही मुले खेळाताना गोंधळ करत होती. तेव्हा आरोपीच्या भावाने राजकरणने मुलांना गोंधळ न करण्यास सांगितले. याचा राग आल्याने साहिब आणि आरोपीमध्ये वाद सुरू झाले. यावेळी राग अनावर झाल्याने साहिबने आपल्या भावाला राजकरणला काठीने मारण्यास सुरूवात केली. हे भांडण सोडवण्यास आईमध्ये पडली तर साहिबने आपल्या ६९ वर्षीय आईला काठीने मारण्यास सुरुवात केली. 


आरोपी फरार, शोध सुरू


या मारहाणीत दोघांच्याही डोक्यात काठी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोक तिथे पोहचले. मात्र लोकांना पाहुन आरोपी साहिबने तिथून पळ काढला. उपस्थितांनी या घटनेची माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. याप्रकरणी पोलीस आरोपी साहिबचा शोध घेत आहेत.