मुंबई : ओडीशाच्या बालेश्वर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्ती आपल्या जुगाराच्या व्यसनात पत्नीला दावावर लावले आणि चक्क तो हारला. इतकंच नाही तर त्याने पत्नीला जुगारात जिंकलेल्या व्यक्तीच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्या महिलेवर पतीसमोरच बलात्कार करण्यात आला. ओडिशा पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यानंतर पीडित महिलेचा पती आणि जुगारात जिंकलेला माणूस दोघेही फरार आहेत. पीडित महिलेला मेडिकल तपासणीसाठी बालेश्वरला पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर फरार आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. 


पीडिताने सांगितले की...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडिताने सांगितले की, २३ तारखेला रात्री सुमारे ११ वाजता पती घरी आला आणि मला सोबत चलण्यास सांगितले. मी विचारले की, कोठे जायचेय तर त्याने उत्तर  दिले नाही. आणि मला जबरदस्ती गावाच्या बाहेर घेऊन आला. तिथे त्यांचे मित्र आधीपासूनच उपस्थित होते. मी त्यांना भावाप्रमाणे मानते पण त्यांनी माझे काहीच ऐकले नाही. माझा हात पकडून मला खेचू लागले. त्यानंतर माझ्या पतीने साडी काढून मला त्यांच्या हवाली केले.
पुढे ती म्हणाली की, जुगारात जिंकलेला व्यक्ती मला थोडे लांब घेऊन गेला आणि माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर मला कळले की, माझ्या पतीने जुगारात दावावर मला लावले होते आणि तो हारला होता.


पीडितेच्या वडिलांचा न्यायासाठी संघर्ष


दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेच्या मुलीने तिच्या आजोबांना (पीडितेच्या वडीलांना) फोन करुन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पीडितेचे वडील मुलासह मुलीच्या सासरी दाखल झाले.
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, याबद्दल मी व्याही आणि जावयाला विचारले असता त्यांनी याबद्दल काहीही माहित नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी गावातील प्रमुखांशी बातचित केली. यावर प्रमुखांनी गावातील वरिष्ठांची बोलण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला. मग हतबल होऊन आम्ही मुलगी व दोन नातवंडांना घेऊन आमच्या गावी परतलो.


हतबल पिता


२७ मे ला स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व्हायला हवा होता. पण पोलिसांनी मुलीच्या पतीसह समेट घडवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर बुधवारी एसपींची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 
मात्र आता पोलिस त्यांना हैराण करत आहेत. पीडित महिलेला उलटेसुटले प्रश्न विचारले जात आहेत. जसं काही तिचा पती नाही तिचं दोषी आहे. या वयात पीडित महिलेचे पती दररोज ३-४ तास पोलिस स्टेशनमध्ये बसून राहतात. हतबल झालेल्या त्या वडीलांना न्यायाची आशा आहे.