बरेली : पैशांवरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नी आणि मुलीला विष देऊन हत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कांकरटोला परिसरात घडली. पोलीस अधीक्षक रोहित सिंह सजवाण यांनी सांगितले की, दुर्गेश शर्मा याचे पत्नी प्रिती हिच्याशी २६ नोव्हेंबर २००९ मध्ये लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षांची मुलगी होती. दुर्गेश हा एका दुकानात मजदुरी करत होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याचे पत्नी सोबत पैसांवरून वारंवार वाद होत होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रितीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आठवड्याभरापूर्वीच त्यांच्या मुलीचे म्हणजे प्रितीची  एफडी (फिक्स डिपॉजिट) म्यॅच्युर झाली होती. या पैशांवरून दोघांमध्ये मंगळवारी वाद झाले. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यानंतर पुन्हा काल रात्री भांडण झाले. 


त्याचबरोबर तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्या रागातच दुर्गेशने आपल्या पत्नी व मुलीला त्यांच्या नकळत विष दिले. त्यानंतर प्रितीची तब्बेत बिघडल्याने दुर्गेशने तिला पंख्याला लटकवले. हे वृत्त प्रितीच्या आई-वडिलांना कळताच त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दुर्गेशला अटक करण्यात आली आहे.