हैदराबाद : येथील २४ वर्षीय व्यावसायिकाने फ्लिपकार्टवरून डीएसएलआर कॅमेरा मागवला होता. पण प्रत्यक्षात दगड आणि खेळण्यात कॅमेरा मिळाल्याने त्याला धक्काच बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४ सप्टेंबरला या व्यावसायिकाने Canon EOS 700 D हा सुमारे ४१००० रूपयांचा फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता. त्याचे पेमेंटही क्रेडीट कार्डाच्या मार्फत केले होते. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी त्याला ही ऑर्डर घरपोच मिळाली. त्याने पॅकेट उघडून पाहिले तर त्यामध्ये कॅमेराच नव्हता.  
या प्रकारानंतर त्याने कस्टमर केअरशी संपर्क साधला. फ्लिपकार्ट्च्या कस्टर केअरनेही त्यांचा डाटा बेस तपासला. त्यानुसार योग्य तोच कॅमेरा पाठवला असल्याची माहिती फ्लिपकार्ट कडून देण्यात आली.  


योग्य प्रोडक्ट पाठवल्याचे सांगत फ्लिपकार्टनेही हात वर केल्याने या ग्राहकाला ४० हजाराचा फटका बसला आहे. सदर प्रकरणाची या ग्राहकाने पोलिस तक्रार केली आहे. त्यानुसार इंडीयन पिनल कोड420 नुसार  फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.