COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या महिला अत्याचाराविरुद्ध संपुर्ण भारतातून आवाज उठवला जात आहे . जसा अत्याचारांचा दर वाढत चाललाय ,तसाच जनतेचा आक्रोशपण वाढत चालला आहे. अशातच लोकांच्या आक्रोशाची तीव्रता दर्शवणारा प्रकार घडला आहे. ही घटना यू.पी.मध्ये घडलेली आहे. ते सूद्धा चालू ट्रेनमध्ये. मुलीवर अत्याचार करणाऱ्याविरूद्ध लोकांनी अशी पाऊले सहसा उचललेली नाहीत. महिला अत्याचार प्रकरणी आता सक्रिय हात पाहायला मिळत आहेत. मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कर्मचाऱ्याला , प्रवाशांनी बेदम चोपल्याची घटना समोर आली आहे. मृतकर्मचाऱ्याचे नाव प्रशांत कुमार असे आहे . तो बिहारचा रहिवासी असून 34 वर्षांचा होता. तो रेल्वे कर्मचारी होता .  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पिडीत मुलीचे वय फक्त 11 वर्षे आहे . मुलीच्या आईने 74 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


चालू रेल्वेतच मारहाण
पोलिसांनी सांगितल्यानुसार , हा प्रकार हमसफर एक्सप्रेसमध्ये घडला . मुलीचे कुटूंब आणि आरोपी बिहारमधील , सीवान रेल्वेस्थानकावरून हमसफर एक्सप्रेसमध्ये चढले होते. नंतर आरोपीने मुलीला त्याची जागा बसायला दिली. मुलीची आई आजूबाजूला नसताना , संधीचा गैरफायदा घेऊन प्रशांत कुमारने मुलीवर लैगिक अत्याचार केले. आई परत आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. शेजारी बसलेल्या प्रवाशांनी पण घडलेली घटना ऐकली. आणि प्रवाशांचा राग अनावर झाला . मुलीवर बलात्कार झाल्याच समोर आल्यावर , लोकांनी आरोपीला मारहाण केली. कानपूर रेल्वेस्थानकावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले . 


रूग्णालयातच मृत्यू झाला
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची तब्येत एकदम खालावली . जी.आर.पी ने त्याला के.पी.एम रूग्णालयात भरती केले. आणि त्याच दवाखान्यात त्याचा मृत्यू झाला.  पोस्टमार्टम केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मृतदेह त्याच्या कुटूंबियांना दिला. पी.ओ.सी.एस.ओ कायद्या अंतर्गत गून्हा दाखल झाला आहे. कोलकता बलात्कार - हत्या प्रकरण , बदलापुर प्रकरण अश्या एकंदर सर्वत्र चालू असलेल्या घटनांबद्दल असलेल्या रागाच्या उद्रेकातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे .