मुंबई : पती-पत्नीचा वाद टोकाला गेल्यावर घटस्फोट घेण्याचा अनेकदा निर्णय घेतला जातो. पण हा वाद कोणता असेल याचा काही नेम नाही. अशीच एक अजब घटना समोर आली आहे. पतीने पत्नीच्या विचित्र सवयीमुळे थेट घटस्फोटाची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पती घटस्फोटाकरता व्ह्युमन प्रोटेक्शन सेलकडे गेला. यानंतर पती-पत्नीला पुन्हा एकदा एकत्र बोलावण्यात आलं. पतीला घटस्फोटामागचं कारण विचारलं असता त्याने दिलेलं कारण ऐकून सगळेच थक्क झाले. कारण होतं पत्नी अंघोळ करत नसल्याचं कारण देत त्याने घटस्फोटाची मागणी केली. 


अलीगढच्या चंडौस पोलीस ठाण्यातील परिसरातील ही घटना आहे. या युवकाचं दोन वर्षांपूर्वी अलीगढमधीलच क्वार्सी पोलीस ठाणे परिसरात राहणाऱ्या तरूणीसोबत लग्न झालं होतं. काही महिने दोघांचा संसार आनंदात सुरू होता. मात्र त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी या दोघांमध्ये वाद होत होते. 


त्यानंतर या दोघांना एकमेकांच्या कोणत्याच गोष्टी पटत नव्हत्या. अखेर हे प्रकरण घटस्फोटाकडे गेलं. दोघांनी काऊंसलिंगच्या टीमने दोघांना बोलावून घेतलं. महिला संरक्षण कक्षातील समुपदेशकाने पती आणि पत्नी दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण पतीने पत्नी अंघोळ न करण्यावरून वाद होतात हे सांगितलं तेव्हा सारेच गप्प बसले.


सेलसमोर पतीने सांगितले की तो आपल्या पत्नीवर नाराज आहे कारण ती दररोज अंघोळ करत नाही,. ज्यामुळे तिच्या शरीरात दुर्गंधी येते. त्यामुळे तो आता तिच्यासोबत राहू इच्छित नाही. पत्नीने पतीचा हा आरोप फेटाळला आहे. घटसफोटाकरता पती काहीही कारण देत असल्याचं तिने सांगितलं आहे.