तंदूर रोटी खात असाल तर सावधान, अशी तंदूर रोटी बनवणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई
हॅाटेलच्या तंदूर रोटीला येणारी चव घरी बनवलेल्या रोटीला येत नाही. पण जर तुम्हाला या रोटी बनवण्याची पद्धत सांगितली तर कदाचित तुम्ही या पुढे कधीही तंदूर रोटी खाणार नाही.
मुंबई : तुम्ही हॅाटेलमध्ये जाता तेव्हा तुम्ही आवडीने तंदूर रोटी खात असाल आणि हे ही तितकच खरं आहे की, हॅाटेलच्या तंदूर रोटीला येणारी चव घरी बनवलेल्या रोटीला येत नाही. पण जर तुम्हाला या रोटी बनवण्याची पद्धत सांगितली तर कदाचित तुम्ही या पुढे कधीही तंदूर रोटी खाणार नाही.
भारताची राजधानी नवी दिल्ली येथील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हा तंदुरी रोटी बनवनारा माणूस ती रोटी तंदुरला चिटकायला हवी म्हणून त्यावर स्वत:ची थुंक लावत आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.
या गुन्ह्याखाली केले अटक
वेस्ट डिस्ट्रिक्टच्या एडिशनल डीसीपी प्रशांत गौतम च्या वक्तव्यानुसार, व्हिडिओच्या आधारावर IPC की धारा 269, 270, 272, 273 अंतर्गत दोन्ही गुन्हेगारांवर FIR दाखल केली आहे. यासह डीपी अॅक्टनुसार त्यांना दंड करण्यात आला आहे. कारण ते लायसन्स नसताना हॉटेल चालवत होते. परंतु, सर्व कलमे जामीन मिळण्यासारखे असल्यामुळे दोन्ही आरोपींना थोड्याच वेळात सोडण्यात आले.
याआधी ही घडली होती अशी घटना
सगळ्यात आधी अशी घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात घडली होती. त्यावेळेस ही लग्न समारंभात एका व्यक्तीने थुंक लाऊन रोट्या शेकवण्याचा प्रकार केला होता. या घटनेला लोक विसरले नाहीत, तो पर्यंत आता ही दुसरी घटना घडली आहे.