आजोबाने सांगितलं, दुकानातून तंबाखू आण... नात ऐकेना म्हणून जे केलं त्याने गाव हादरलं!
मध्य प्रदेशाच्या गुना जिल्ह्यातील धक्कादायक घटना घडली!
Crime News : मध्य प्रदेशाच्या गुना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गुना जिल्ह्यात (Madhya Pradesh Crime News) राहणाऱ्या एका आजोबाने आपल्याच नातीची हत्या केल्याची घटना घडली. आजोबाने नातीला दुकानातून तंबाखू (tobacco) आणण्याचा आग्रह केला. मात्र, सतत सांगून देखील नातीने न ऐकल्याने संतापलेल्या आजोबाने आपल्या नातीचाच खेल खल्लास केला. (Man takes life of 8 year old grandniece for not bringing tobacco from shop)
तंबाखू आणण्यास नकार दिल्यानं एका 60 वर्षीय व्यक्तीनं 8 वर्षांच्या नातीची (8 year old grandniece) कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. छतरपुरा गावात ही घटना घडली. घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. नातीच्या डोक्याला इजा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गुना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
असा सापडला गुन्हेगार...
पिडीत मुलीचे आई वडिल दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करतात. नेहमीप्रमाणे मजुरीला गेले असताना मुलगी आणि तिचे आजोबा दोघेच घरी होते. कामावरून घरी आल्यावर आई वडिलांनी मुलगी दिसली नाही. त्यानंतर सर्वांनी शोधाशोध केली. मात्र, मुलीचा काही पत्ता लागला नाही. आरोपीने त्याचवेळी गावसोडून धूम ठोकली.
6 किलो सोने, फरशीवर कोटींच्या नोटा, सजावट पाहून फिटेल डोळ्यांचे पारणं; पाहा Photo
अखेर शोध न लागल्याने आई वडिलांनी पोलिसांना फोन लावला. पोलीस पथकाने शोधाशोध सुरू केली. त्यावेळी मुलीचा मृतदेह जनावरांसाठी आणलेल्या चाऱ्यामध्ये सापडला. आई वडिलांचा संशय अधिक बळकट होत होता. त्याचवेळी गावाबाहेरून आलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि अखेर गुन्ह्याची कबुली दिली आहे.