6 किलो सोने, फरशीवर कोटींच्या नोटा, सजावट पाहून फिटेल डोळ्यांचे पारणं; पाहा Photo

135 वर्षे जुन्या मंदिरात ही सजावट करण्यात आलीय

Updated: Oct 1, 2022, 04:15 PM IST
6 किलो सोने, फरशीवर कोटींच्या नोटा, सजावट पाहून फिटेल डोळ्यांचे पारणं; पाहा Photo  title=
(फोटो सौजन्य - ANI)

आंध्र प्रदेश : देशभरात नवरात्रोत्सव (navratri) उत्साहात साजरा केला जात. देशाच्या विविध भागात दुर्गा देवीची (Devi) वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जात आहे. आंध्र प्रदेशातील (andhra pradesh) वासवी कन्यका परमेश्वरी देवीच्या (Vasavi Kanyaka Parameswari) 135 वर्षे जुन्या मंदिरात नवरात्रीनिमित्त (navratri) 8 कोटी रुपयांच्या नोटा आणि सोन्याच्या (Gold) दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. देवीला 6 किलो सोने, 3 किलो चांदी आणि 6 कोटी रुपयांच्या चलनी नोटांनी सजवण्यात आले होते. मंदिराच्या (Temple) भिंतींवर आणि फरशीवर चलनी नोटा चिकटवण्यात आल्या होत्या. हे मंदिर पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पेनुगोंडा शहरात आहे.

या मंदिरात दसऱ्याच्या काळात देवीला सोने आणि रोख नोटांनी सजवण्याची परंपरा जवळपास दोन दशकांपासून सुरू आहे. शुक्रवारी देवी महालक्ष्मीच्या अवताराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर समितीने एएनआयला सांगितले की, "हा सर्व सार्वजनिक देणगीचा भाग आहे. पूजा संपल्यानंतर ते परत केले जाईल. ते मंदिर ट्रस्टकडे जाणार नाही."

एएनआनच्या फोटोंमध्ये, नोटांचे बंडल झाडांवर आणि छताला लटकलेले दिसत आहेत. मंदिरात येणारे भाविक त्याच्याकडे उत्सुकतेने पाहतात. नवरात्री उत्सवात देवीला दिलेली रोख रक्कम आणि सोने त्यांच्यासाठी भाग्यवान ठरेल आणि  व्यवसाय सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास आहे.