हल्ली AI हे आपल्या रोजच्या जगण्यात येऊ लागलं आहे. AI च्या मदतीने अनेक गोष्टी थोड्या सोप्या होत आहेत. एका तरुणाने झोपेत नोकरीसाठी अप्लाय केलं. तेही एक दोन ठिकाणी नाही तर 1000 नोकऱ्यांसाठी. सकाळी जे घडलं ते अतिशय धक्कादायक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून AI चं जाळ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सोशल मीडियावर या संदर्भात अनेक अपडेट्स येत असतात. यामधील अनेक गोष्टी अक्षरशः चकित करणाऱ्या असतात. डिजिटल जगतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आपल्या कामाच्या पद्धतीला पूर्णपणे बदलून टाकलं आहे. नोकरी शोधण्यापासून ते अगदी नोकरीसाठी अर्ज, पत्र लिहिण्यापर्यंत सगळ्याच क्षेत्रात AI मदत करत आहे. 


काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने AI ची मदत घेऊन रात्रभरात तब्बल 1000 नोकऱ्यांवर अर्ज केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार झोपेत घडला आहे. पण याचा परिणाम जो झाला त्याने त्या तरुणासकट आपल्या सगळ्यांचीच झोप उडून जाईल. सकाळी हा मुलगा उठला तेव्हा तो अक्षरशः चकित झाला. AI ने या तरुणाचं काम तर सोप केलं पण सकाळी उठला तेव्हा याला चक्क 50 हून अधिक कंपन्यांमध्ये मुलाखतीचे फोन आले होते. 


I used AI to automatically apply for 1000 jobs - and I got 50 interviews!
by inGetEmployed

AI ने सांभाळली नोकरीचं ऍप्लिकेशन 


रेडिटच्या 'गेट एम्प्लॉयड' फोरमवर आपली व्यथा मांडताना त्या माणसाने सांगितले की, त्याने स्वतः तयार केलेल्या एआय बॉटचा वापर केला. येथे नोकरीच्या उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करतो. नोकरीचे वर्णन वाचतो, प्रत्येक नोकरीसाठी स्वतंत्र सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करण्यात आलं आणि कंपनीच्या प्रश्नांची उत्तरे देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. "मी गाढ झोपेत असताना माझा बॉट रात्रभर काम करत होता आणि या प्रक्रियेमुळे मला एका महिन्यात सुमारे 50 मुलाखतीचे कॉल येण्यास मदत झाली," असे त्या व्यक्तीने लिहिले.


नोकरीचा अर्ज तयार करण्याची पद्धत 


व्यक्तीचा एआय बॉट पूर्णपणे स्वयंचलित आहे आणि तो नोकरीच्या वर्णनावर आधारित कस्टमाइज्ड सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करतो. यामुळे केवळ स्वयंचलित स्क्रीनिंग सिस्टीम पास करणे सोपे झाले नाही तर मानवी भरती व्यवस्थापकांचे लक्ष देखील वेधून घेतले. "प्रत्येक नोकरीसाठी कस्टमाइज्ड अर्जामुळे माझे प्रोफाइल अधिक आकर्षक बनले आणि माझ्या निवड प्रक्रियेत मला मदत झाली," असे त्यांनी लिहिले.