Funny Viral Video: जगभरात दारू पिणाऱ्यांची कमी नाही. अनेकजण कवळ्या वयातच नशेच्या दिशेने पाऊल ठेवतात. त्यामुळे त्याचा परिणाम वाईट परिणाम आरोग्यावर देखील होतो. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जातोय. ज्यामध्ये पोलीस आल्यावर दारू पिणाऱ्या तरुणाची (Viral Video of drinking alcohol man) नशाच उतरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दारूडे रस्त्यावर लोळतानाचे व्हिडीओ (trending Video of alcohol Addict man) तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. अशातच आता रस्त्यावर गाडी लावून शायनिंग मारणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकजण खळखळून देखील हसले.


आणखी वाचा - Team India बद्दल मोठी भविष्यवाणी, 'हा' खेळाडू एकहाती T20 World Cup जिंकून देणार!


एक तरुण मोकळ्या रस्त्यावर एका आलिशान दुचाकीवर बसला होता. पिवळ्या रंगाची ही दुचाकी होती. गाडीवर बसल्या बसल्या हा पठ्ठ्या दारू पित बसला होता. तर एक दुसरा तरुण त्याचा व्हिडीओ बनवत होता. त्यावेळी अचानक पोलिसांची एन्ट्री होते. पोलीस आल्याचं पाहताच व्यक्तीने दारूची बॉटल खाली ठेवली आणि गाडी चालू केली (Shocking Video of alcohol Addict man).


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by OK (@videozaman1)


दरम्यान, गाडी चालू करून त्याने रेस वाढवली. पोलीस आले आणि गेले, त्यामुळे तरूणाला अटक करण्यात आली नाही. हा तरूण दारू पिताना सापडला असता तर पोलिसांनी नक्की कारवाई केली असती. दरम्यान, हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला, तर अनेकांनी कमेंट करत तरुणांची खिल्ली देखील उडवली आहे.