मुंबई : मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांतून देशातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. एवढंच नव्हे तर अनेक नद्यांच्या प्रवाहात वाढ झाली आहे. नदी पार करणं स्थानिकांना कठीण झालं आहे. मात्र अशातच अनेकजण वाढलेल्या प्रवाहाच्या नद्या पार करण्याचा प्रयत्न करतात. आपला जीव धोक्यात टाकत हा प्रवाह पार करतात. असाच प्रयत्न करण एका तरूणाला चांगल भारी पडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एका तरूणाला बेदम मारहाण केल्याचं दिसत आहे. नदीचा प्रवाह मोठ्याने वाहत असताना एका तरूणाने नदी पार करण्याचा प्रयत्न केला आहे. नदीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाणाऱ्या पूलावरून हा तरूण जात होता. 



नदीचा प्रवाह एवढा वाढला होता की, पुलावर देखील पाणी होतं. असं होत असताना नदीच्या दुसऱ्या टोकावर वडिल आणि भाऊ उभे होते. तरूणाने नदीचा प्रवाह पार करताच वडिलांनी आणि भावाने मुलाच्या कानशिलात लगावण्यास सुरूवात केली आहे. 


सध्या महाराष्ट्रासह भारतात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी दरड कोसळणे, नदीच्या प्रवाहातून वाहून जाणाऱ्या दुर्घटना घडत आहेत. असं असताना अशा पद्धतीची जोखीम घेणे ही धोकादायक आहे. तरूणावर हात उगारण्याचा हा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे.