`मंदसौर बलात्कारानंतर बॉलीवुडकरांना लाज वाटत नाही का ?`
...मात्र याच सिनेस्टार्सची अळीमिळी गुपचिळी नेटकऱ्यांना अस्वस्थ करतेयं.
कपिल देशपांडे झी मीडिया मुंबई : मध्यप्रदेशातल्या मंदसौरमध्ये सध्या वातावरण तापलयं..इथे एका सात वर्षीय मुलीवर बलात्कार आणि तिची निर्घूण हत्या झाली. यानंतर आरोपींवर कारवाईची मागणी करत अनेक आंदोलनं झाली.असाच प्रकार कठुआ बलात्कारप्रकरणात झाला होता आणि त्यावर बॉलिवूडमधल्या अनेकांनी तोंडसुख घेतलं होतं..मात्र याच सिनेस्टार्सची अळीमिळी गुपचिळी नेटकऱ्यांना अस्वस्थ करतेयं. दरम्यान रितेश देशमुख आणि फरहान अख्तर य़ांनी मात्र मंदसौर प्रकरणी भूमिका घ्यायची हिंमत दाखवली आहे.
नेटकऱ्यांचा सवाल
सोनम कपूर, करीना कपूर आणि स्वरा भास्कर या तिघींवर नेटक-यांचा रोष व्यक्त होतोयं..मंदसौर बलात्कार प्रकरणी हे बॉलिवूडकर का मुक गिळून गप्प बसले आहेत. असा सवाल नेटकरी विचारत आहेत.त्याला कारण ठरलीये ही कठुआ बलात्कार प्रकरणात या तिघींनी भूमिका घेतली होती. कठुआ प्रकरणी करिनानं 'मला भारतीय असल्याची लाज वाटत असल्याचं म्हंटलं होतं' तर सोनमनंही करीनाच्या सूरात सूर मिळवला होता. 'आता खुप झालं. सात वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार करणाऱ्या नराधमांना कोठर शिक्षा द्या', 'अशी विकृत माणसं बघता हा देश लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का ?'अशा प्रतिक्रीया देण्यात आल्या होत्या. मात्र आता यांच्याकडून मंदसौर प्रकरणात कुठलचं वक्तव्य झालेलं नाही..
आरोपींची चेहराओळख ?
मध्यप्रदेशच्या मंदसौर सामुहिक बलात्कार प्रकरणी दोन्ही आरोपींची माहिती मुंबई पोलिसांनी मागिवली आहे. नवी मुंबई आणि ठाणे पोलीस क्षेत्रात झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींची चेहरेपट्टी ही मंदसौर सामुहिक बलात्कार प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींशी मिळती जुळती असल्याचा अंदाज आहे...त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी पत्रव्यवहारातून मंदसौर पोलिसांकडून या आरोपींची माहिती मिळवली.