नवी दिल्ली : केंद्रिय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी 'ब्ल्यू व्हेल' या खेळाला इंटरनेटवरून हटवण्याची मागणी गृहमंत्रालयाला केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांत  भारतात ब्ल्यू व्हेल या खेळाचे लोण वाढते आहे. खेळाचा एक भाग म्हणून अनेक लहान मुलं 'आत्महत्ये'सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.  त्यामुळे मुलांपर्यंत हा खेळ पोहचू नये म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहे.  


महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अनुसार, 'मनेका गांधी यांनी सोमवारी गृहमंत्री राजनाथ सिंग व केंंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासमोर हा प्रश्न उठवला आहे.  'ब्लू व्हेल' हा खेळ इंटरनेटवरून हटवण्याची मागणी केली होती. राष्ट्रीय  बाल अधिकार संरक्षण आयोगाने गेल्या  मे महिन्यापासून या बाबत मंत्रालयाला तीन वेळेस पत्र लिहले आहे' 


अमिताभ बच्चन यांनीदेखील केले आवाहन!  


महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून या खेळा बाबत चिंता व्यक्त केली होती.  आयुष्य जगा, अनुभवा ते वेळेच्या आधी संपवू नका अशा शब्दांत बीग बींनी तरूणाईला ब्लू व्हेल खेळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.