Mani Shankar Aiyar Daughter Ayodhya Ram Mandir: काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांची कन्या सुरन्या अय्यर यांच्यासंदर्भात एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाविरोधात सुरन्या यांनी 3 दिवसांचं व्रत ठेवलं होतं. त्यांनी सनातन विरुद्ध सोशल मीडियावर अपशब्द वापरला होता. आता या प्रकरणामध्ये सुरन्या राहत असलेल्या सोसायटीने त्यांना आणि मणिशंकर अय्यर यांना पत्र लिहिलं आहे. सुरन्या यांनी जाहीरपणे त्यांच्या या विधानासाठी माफी मागणी किंवा सोसायटी सोडावी, असं त्यांना सांगण्यात आलं आहे. सुरन्या दिल्लीमधील जंगपुरा परिसरामध्ये वास्तव्यास आहेत.


शिव्या-शाप देण्याऐवजी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरन्या अय्यर यांनी सोशल मीडियावर या प्रकरणासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेस नेत्याच्या मुलीने फेसबुकवर, "संबंधिक रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन ज्या कॉलिनीमधील आहे तिथे मी राहतच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, मी आता प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे कारण भारतामध्ये प्रसारमाध्यमं विष पसरवणे आणि भ्रम निर्माण करण्याचं काम करतात. तुम्ही सर्वजण मला ओळखता. मी आतापर्यंत भारतामध्येच माझं सर्व आयुष्य जवळपास 50 वर्षे घालवली आहेत. मी सर्व प्रकारच्या राजकीय दृष्टीकोन असलेल्या व्यक्तींच्या सहवासामध्ये लहानाची मोठी झालेली आहे. याच लोकांमध्ये मी शिकले आहे, काम केलं आहे आणि आजही सक्रीय आहे. सध्या मी माझं म्हणणं माझ्या फेसबुक आणि युट्यूबवरच पोस्ट करणार आहे. तुम्ही स्वत: शांततेत याबद्दल विचार करावा. मी प्रसारमाध्यमांच्या सर्कसपासून वाचण्याचा प्रयत्न करते कारण भारतात आपल्याला अधिक उत्तम प्रकारच्या सर्वाजनिक संवादाची आवश्यकता आहे, असं मानते. आपण शिव्या-शाप देण्याऐवजी काहीतरी विचार करण्याचा प्रयत्न करुयात, जय हिंद!," अशी पोस्ट लिहिली आहे.


पोस्टमध्ये काय म्हटलेलं?


जंगपुरा परिसरामध्ये राहणाऱ्या सुरन्या यांनी अयोध्येमधील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली होती. मी माझ्या आईच्या हातून एक चमचा मध घेत व्रत तोडलं, असं म्हटलं होतं. सुरन्या यांच्या या अशा पोस्टमुळे सोसायटीमधील लोकांनी नाराजी व्यक्त केली. आता याच प्रकरणामध्ये सुरन्या यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे.


15 दिवसांपूर्वी दुसरी मुलगी होती चर्चेत


15 दिवसांपूर्वी मणिशंकर अय्यर यांची मुलगी यामिनी अय्यरही चर्चेत होत्या. केंद्रीय गृह मंत्रालयाने यामिनी अय्यर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या प्रसिद्ध थिंक टँकचं फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन अॅक्ट रद्द केला होता.