COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाहोर : काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा सावरकरांवर टीका केली आहे. फाळणीसाठी जिन्ना नव्हे, तर सावरकर जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सावरकरांनीच सगळ्यात आधी हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना आणली, असं मणिशंकर अय्यर लाहोरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.


मणिशंकर अय्यर असं म्हणतात, 'विनायक दामोदर सावरकर नावाच्या व्यक्तीने १९२३ साली, एक पुस्तक लिहिलं होतं. सावरकरांनी भारतात अशा शब्दाची रचना केली, ज्याचं नाव हिंदुत्व होतं, आपण हिदुत्वाच्या बाबतीत तर जाणतो, पण हिंदुत्व पूर्णपणे नवीन शोध होता, आणि हिदुंत्वाला हिंदू राष्ट्र जोडलं, तर दोन राष्ट्रांच्या थेअरीचे-आयडीयाचे गुरू सावरकर होते, ज्यांचे लोक आज भारतात सत्तेत आहेत.'


अय्यर यांनी असंही म्हटलं की, ७० टक्के हिंदू आता नरेंद्र मोदी सरकारला मतं देणार नाहीत, म्हणून भाजपकडून हिंदुत्व वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच ७० टक्के लोकांनी मागील निवडणुकीत मोदी सरकारलं मतं दिली नव्हती, कारण लोकांना वाटलं होतं की, आपल्या अडचणी दूर होतील. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी देखील जिन्नाच्या शब्दांना सन्मान दिला आहे. मणिशंकर यांनी याआधी जिन्ना यांना कायद-ए-आज़म म्हटलं होतं, ज्यावरून भाजपसह इतर पक्षांनी आक्षेप नोंदवला होता.