Manipur Violence: मणिपुरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झालीय. तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह इथं दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. त्याआधी एका जवानाच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. पीटीआयने दिलेल्या बातमीसमोर शहीद झालेल्या जवानाचं नाव तखेलंबम सैलेशवोर (Takhellambam Saileshwore) असं आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्या पहिल्या जवानाचं नाव वांगखेम सोमोरजीत असं असून ते पोलीस कमांडो होते. सोमोरजीत हे इम्फाल जिल्ह्यातील मालोम इतं राहाणारे होते. मोरेहमध्ये संशयित कुकी दहशतवाद्यांनी सुरक्षादलाच्या एका वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात इंडियन रिझर्व्ह बटालियनचे दोन जवान जखमी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनेंतर मुख्यमंत्री सचिवालयात तातडीची उच्च स्तरीय बैठक बोलवण्यात आली. यात मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या सह मंत्रीमंडळातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दशतवाद्यांनी मोरेह शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला. याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. कुकी दहशतवाद्यांनी मोरेह जवळ असलेल्या एका सुरक्षा चौकीवर बॉम्ब हल्ला केला. यानंतर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. पण या हल्ल्यात पोलिसांच्या वाहनांचं आणि इतर वाहनांचं नुकसान झालं. 


एका पोलिसांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली होती. यामुळे संतापलेल्या कुकी दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर गोळीबार केला. पोलीस अधिकारी आनंद यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी फिलिप खोंगसाई आणि हेमोखोलाल माते या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांनी सुरक्ष रक्षकांच्या वाहनावर गोळीबार केला होता. 


 कुकी इनपी तेंगनोउपल(KIT), चुराचांदपूर जिल्ह्यातील इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) आणि कांगपोकपी जिल्ह्यातील कमेटी ऑन ट्रायबल युनिटी (COTU) या संघटनांनी दोघांच्या अटकेचा निषेध केला आहे. 


किती लोकांचा मृत्यू?
गेल्या वर्षी मैतेई आणि कुकी समाजात झालेल्या हिंसाचारात 180 लोकांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी देखील झाली होती.