मोदींवरची `नीच` टीका भोवली, मणीशंकर अय्यर यांचं निलंबन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या शब्दामध्ये केलेली टीका काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांना भोवलेली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या शब्दामध्ये केलेली टीका काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांना भोवलेली आहे. काँग्रेसनं मणीशंकर अय्यर यांना काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केलं आहे. तसंच काँग्रेसनं अय्यर यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
मणिशंकर अय्यर यांचं स्पष्टीकरण
मणिशंकर अय्यर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, जेव्हा मी ‘नीच’ म्हणालो त्याचा अर्थ खालच्या जातीचा असा होता. हिंदी माझी मातृभाषा नाहीये, त्यामुळे मी जेव्हाही हिंदी बोलतो तेव्हा इंग्रजीत विचार करतो. अशात जर याचा काही चुकीचा अर्थ निघत असेल तर मी माफी मागतो. दररोज पंतप्रधान मोदी आमच्या नेत्यांबाबत अभद्र भाषेचा वापर करतात. मी एक फ्रिलान्स कॉंग्रेसी आहे, मी पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीये. त्यामुळे मी पंतप्रधानांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो.
राहुल गांधींनीही अय्यर यांना झापलं
अशाप्रकारची टीका केल्यावर राहुल गांधींनीही मणीशंकर अय्यर यांना खडे बोल सुनावले. भाजप आणि पंतप्रधान काँग्रेसवर टीका करताना नेहमीच अभद्र भाषेचा वापर करतात. काँग्रेसची संस्कृती वेगळी आहे. मणीशंकर अय्यर यांनी भारताच्या पंतप्रधानांविषयी वापरलेली भाषा चुकीची आहे. मणीशंकर अय्यर यांनी याबाबत माफी मागावी अशी माझी आणि काँग्रेसची इच्छा आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते.
पंतप्रधान मोदींचा पलटवार
पंतप्रधान मोदी यांनी यावर पलटवार केलाय. ते म्हणाले की, ‘अय्यर यांचं विधान मुघलसारख्या मानसिकतेला दर्शवतं. अय्यर यांनी पूर्ण गुजरातचा अपमान केला आहे. आणि जनता आपलं मत देऊन नीच म्हणणा-यांना उत्तर देईल. त्यांनी सभेत उपस्थित लोकांनाही हा प्रश्न विचारला. काय मी नीच आहे?
ते म्हणाले की, भलेही मला कुणी नीच म्हणत असेल पण मी काम गांधींच्या विचारांचे करतो. मान-सन्मान-मर्यादा हे भाजपचे संस्कार आहेत. मणिशंकर अय्यर हे मला नेहमीच नीच म्हणतात. गुजरातमध्ये कॉंग्रेस सत्तेत होती तेव्हाही माझा ते अपमान करत होते. मला तुरुंगात पाठवण्याचा कट रचण्यात आला होता’.
काय म्हणाले होते मणीशंकर अय्यर