मनमाड : मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाला अखेर मंजुरी मिळालीय. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या रेल्वेमार्गाची घोषणा केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लवकरच या मार्गाचं भूमीपूजन होईल अशी माहिती गडकरींनी दिलीय. हा रेल्वेमार्ग पूर्णपणे ब्रॉडगेज असणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.


अनेक पूलांनाही मंजुरी


त्याचबरोबर धुळे, नंदुरबारमध्ये अनेक पूलांनाही मंजुरी मिळालीय. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांमुळे हे काम लवकर मार्गी लागल्याचं गडकरी म्हणाले. यासोबतच कल्याण-कसारा या रेल्वेमार्गालाही मंजुरी देण्यात आलीय.