नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची आज संसदीय राजकारणातून एक्झिट झाली. संसदेचे अधिवेशन होण्याआधीच त्यांची संसदीय कारकिर्द संपल्याने त्यांना खास निरोप देता आला नाही. मात्र, त्यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कालावधीन आणि पंतप्रधान असताना अनेक चांगले निर्णय घेतले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कायम राहिली आहे. ते स्वभावाने शांत होते. मात्र, कामकाजात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला खरी उभारी दिली. भारताच्या अर्थकारणाला ऐतिहासिक कलाटणी देणारे आणि भारताला जगात आर्थिक महाशक्ती म्हणून मानाचं स्थान मिळवून देणारे अशी डॉ. मनमोहन सिंग यांची झाली ओळख आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. मनमोहन सिंग यांची २८ वर्षांची प्रदीर्घ कारकिर्द राहिली. १९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत होती. मात्र, डॉ. मनमोहन सिंह यांना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. नरसिंह राव आणइ मनमोहन सिंह या दोघांनी भारतीय अर्थव्यवस्थेला केवळ चालना दिली नाही तर उदारीकरण केले आणि भारताच्या आर्थिक स्थिती अधिक मजबूत केली. या नव्या आर्थिक पर्वाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे भारत अर्थव्यवस्थेत स्थिरावला.


ऑक्टोबर १९९१ पासून डॉ. मनमोहन सिंह राज्यसभेवर निवडून गेलेत. काँग्रेसकडून सलग पाच वेळा ते राज्यसभेवर निवडून गेलेत. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे ते देशाचे पंतप्रधान होते. दहा वर्षे पंतप्रधान, पाच वर्षे अर्थमंत्री आणि सहा वर्षे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अशी त्यांची कारकीर्द राहिली.