नवी दिल्ली : 'मिस वर्ल्ड २०१७' या स्पर्धेत भारताच्या मानुषी छिल्लर हिने बाजी मारली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत जगभरातील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मात्र, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मानुषीने विश्वसुंदरीचा मुकूट पटकावला.


या स्पर्धेमध्ये स्पर्धेत 'मिस इंग्लंड' स्टेफनी हिल ही दुसऱ्या क्रमांकावर तर 'मिस मेक्सिको' असलेली अॅण्ड्रीया मेझा तिसऱ्या क्रमांकावर राहिली.


मनुषीने दिलं या प्रश्नाचं उत्तर


या स्पर्धेत एका प्रश्नाच्या उत्तरामुळे मानुषीला हा हा मानाचा मुकूट पटकावला आहे. मानुषीने या प्रश्नाचं उत्तर इतकं छान दिलं की तिने सर्वांचीचं मनं जिंकली.कुठल्या प्रोफेशनमध्ये सर्वाधिक पगार दिला पाहिजे आणि का? या प्रश्नावर मानुषीने उत्तर दिलं की, "आईला सर्वात जास्त सन्मान मिळायला हवा आणि हा पगाराचं बोलायचं झालं तर, याचा अर्थ सन्मान किंवा पगाराच्या रूपात नाही तर प्रेम आणि आदराच्या स्वरूपात असावा".


मानुषी छिल्लर हिच्यापूर्वी हा किताब प्रियंका चोप्राने पटकावला होता. ऐश्वर्या रॉय १९९४ मध्ये हा किताब पटकावला, त्यापूर्वी डायना हेडन १९९७ साली, युक्ता मुखी १९९९ साली आणि प्रियंका चोप्रा २००० साली मिस वर्ल्ड कप किताब भारताला जिंकून दिले आहेत.