ज्येष्ठ लेखक श्रीधर माडगूळकर यांचे वयाच्या ७२व्या वर्षी निधन
ज्येष्ठ लेखक श्रीधर माडगूळकर यांचे दीर्घ आजाराने निधन
पुणे : गदिमा यांचे सुपूत्र आणि ज्येष्ठ लेखक श्रीधर माडगूळकर यांचे आज निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. पु्ण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ६ फेब्रुवारी १९४७ मध्ये श्रीधर माडगूळकर यांचा जन्म झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
श्रीधर माडगूळकर यांची 'आठी आठी चौसष्ट' ही कादंबरी अतिशय गाजली. ग.दी. माडगूळकर यांच्या आठवणींवर त्यांनी लिहिलेले 'मंतरलेल्या आठवणी' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील अनेक कार्यक्रमांत ते सहभाग घ्यायचे. १९७० साली त्यांनी 'जिप्सी' मासिकाचे संपादन कून अनेक तरूणांच्या त्यांचे लेखन कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. श्रीधर माडगूळकरांनी अनेक सामाजिक कार्यातून समाजासाठी मोठे योगदान दिले आहे.