मुंबई: लग्न पत्रिका म्हटलं की ती कशी सुंदर आणि भारदार हवी असं प्रत्येक विवाह करणाऱ्याचं स्वप्न असतं. पण एका तरुणानं चक्क शेतकरी आंदोलनाची थीम घेऊन लग्नपत्रिका छापली आहे. ही पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तरुणानं आपल्या लग्नाच्या पत्रिकेवर शेतकरी आंदोलनाला स्थान दिलं आहे. नो फार्मर नो फूड असं स्लोगन या लग्नपत्रिकेवर देण्यात आलं आहे. याशिवाय भगत सिंह आणि सर छोटूराम यांचे फोटो देखील या पत्रिकेवर छापण्यात आले आहेत. 


आज तकनं दिलेल्या वृत्तानुसार ह्या पत्रिका कॅथलच्या वेगवेगळ्या प्रिंटिंग प्रेसमधून छापल्या जात आहेत. नो फार्मर नो फूड, हे स्लोगन तुफान ट्रेन्ड होत आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून इथे येणाऱ्या सर्व लग्नपत्रिकांवर हे स्लोगन हवं अशी नागरिकांची मागणी असल्याची माहिती इथल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्यांनी दिली.


नवरदेव कमलदीप याने त्याच्या लग्नपत्रिकेवरही हे प्रिंट करून घेतलं आहे. सोशल मीडियावरुन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देता आला असता मात्र लग्नपत्रिकांवर अशा पद्धतीनं कार्ड छापून अधिक जास्त पाठिंबा देत असल्याचं त्याने सांगितलं. 



OMG!'या' कारणामुळे लग्नातील फूड मेनूकार्डची तुफान चर्चा


राजधानी दिल्लीमध्ये केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या कृषी धोरणाविरोधात शेतकऱ्यांचं 70 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी अशा लग्नपत्रिका छापल्या जात असून सध्या सोशल मीडियावर त्या तुफान व्हायरल होत आहेत. 


काही दिवसांपूर्वी लग्नात अहेर देण्यासाठी QR कोडचा वापर केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर कोलकातामधील एका दाम्पत्यानं तयार केलेलं फूड मेनूकार्डही चर्चेचा विषय ठरलं होता. आधारकार्डसारखाच हुबेहुब मेनूकार्ड तयार केल्यानं चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा लग्नाच्या पत्रिकेची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.