नवी दिल्ली : श्री राम कथा वाचक मोरारी बापू यांचे अनुयायी जगभरात पसरले आहेत. मात्र 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी सांगितलेल्या मार्गांवर चालणारे आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करणारे लोकं फार कमी आहेत. मात्र गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील एका युवकाने बापूंनी दिलेल्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. या मुलाने चक्क स्मशनात आपलं मंगल कार्य केलेलं आहे. 
यावेळी स्मशानात ज्या जागी चिता जाळली जाते त्या जागी पवित्र अग्नीला प्रज्वलित करण्यात आले. मंत्र पठण झाले, सनई वादन झाले, सर्व देवांचे आवाहन करून हा विवाह विधीवत पार पडला. 


मोरारी बापू यांनी काय दिली शिकवण?


कथा वाचक मोरारी बापू यांनी एकदा वाराणसीच्या प्रवचना दरम्यान एक गोष्ट सांगितली होती. जन्म आणि मृत्यूचा उत्सव स्मशान भूमीत साजरा केला पाहिजे. यातून प्रेरणा घेत गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात महुवात एका पुजारीच्या मुलाने स्मशानात लग्न करून संसाराला सुरूवात केली. तलगाजरडा गावांत राहणाऱ्या घनश्याम दास आणि पारूलने शनिवारी स्मशानात लग्न केलं. 


स्मशानात विवाह करण्यासाठी कोणतेही पंडित तयार झाले नाहीत. तेव्हा स्वतः मोरारी बापू हे स्मशानात पोहोचले आणि त्यांनी स्वतः या जोडीचा हा मंगल सोहळा केला. यावेळी चितेच्या स्थानावरील अग्नि हे नव दाम्पत्याच्या मंगल कार्याची साक्षिदार होती. ढोल - ताशांच्या आवाजात या दोघांनी हा विवाह सोहळा संपन्न केला. आणि तेव्हा स्वतः मोरारी बापू मंत्रोच्चार करत होते. 



घनश्यामने मीडियाला सांगितले की, मोरारी बापू यांनी सांगितले होते की, स्मशान ही अतिशय पवित्र जागा आहे. आणि तेव्हाच मी संकल्प घेतला होता की मी स्मशानात विवाह करणार. तेव्हा त्यांनी स्मशान भूमीचं पवित्र स्थान सांगितलं होतं. इथे आल्यामुळे जीवनात वैराग्य भाव येत नाही