कन्नोज : मंदिर, धर्मशाला किंवा हॉलमध्ये लग्न होताना आपण अनेकदा पाहिली आहेत. पण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तुम्ही एका लग्न सोहळ्यात भरपूर पोलिसांनी पाहिलंत तर... तुम्हाला वाटेल काही तरी गोंधळ आहे. पण एक असं लग्न ज्यामध्ये नाच गाणं नाही, कुठेही वरातील नाहीत तर आहेत ते फक्त पोलिस. आणि महत्वाचं म्हणजे हे लग्न कोणत्याही हॉलमध्ये न होता हा सोहळा संपन्न झाला तो म्हणजे एका पोलीस ठाण्यात. असंच एक लग्न झालं आहे कन्नौजमधील पोलीस स्थानकात मंगळवारी संपन्न झाली. 


काय आहे हा प्रकार? 


हा प्रकार कन्नौज जिल्ह्यातील छिबरामऊ पोलीस ठाण्यात पार पडला. मंगळवारी या परिसरातील नवीन वस्तीतल्या अनुपचे लग्न होते. या सोहळ्यातील वधु ही कानपूर परिसरातील होती. वधु प्रियंका ही आपल्या वराची वाट पाहत होती. सगळ्या विधी अगदी शांततेत पार पडत असताना कोणत्यातरी गोष्टीवरून लहान मुलांचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की वराकडील मंडळींनी वधुच्या आत्यासोबत मारहाण सुरू केली. आणि हा हंगामा इतका वाढला की वधु पक्षाने लग्न करण्यास नकार दिला. 



या सगळ्या वादावरून पंचायत देखील बसवण्यात आली. वाद इतका वाढला की शेवटी तो पोलीस ठाण्यात आला. आणि पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांततेने घ्यायला सांगितलं. पोलीस वर-वधुला घेऊन पोलीस ठाण्यात आले. आणि त्यांनी तिथे त्या दोघांचं लग्न लावण्याचा विचार केला. आणि हे लग्न अगदी थाटामाटात पोलीस स्टेशनमध्ये पार पडलं.