नवी दिल्ली : पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात लष्कराचे 23 वर्षीय कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासह 4 जवान शहीद झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल यांच्या बलिदानावर देशाला आणि त्यांच्या कुटुंबाला अभिमान आहे. शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आईने म्हटलं की, माझे अजून मुलं असते तर मी त्यांना आर्मीतच पाठवलं असतं.


पाकिस्तानने रविवारी रात्री अँटी-टँक गायडेड मिसाईलने हल्ला करत भारतीय लष्कराचं बंकर उडवलं. या हल्ल्यात 4 भारतीय जवान शहीद झाले. पण पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी देखील जोरदार उत्तर दिलं. ज्यामध्ये पाकिस्तानच्या अनेक चौक्यांचं नुकसान झालं.


लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, 'भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ नाही जाणार. पाकिस्तानच्या फायरिंगचं जोरदार उत्तर दिलं जाईल. यानंतर पाकिस्तान विरुद्ध जोरदार कारवाई होऊ शकते असे संकेत मिळत आहेत.


सीमेवर सुरु असलेल्या फायरिंगमुळे 84 शाळांना 3 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. राजौरी जिल्ह्यात भिंबर गली सेक्टरमध्ये पाकड्यांनी फायरिंग केली. ज्यामध्ये रायफलमॅन रामअवतार, शुभम सिंह आणि हवलदार रोशन लाल शहीद झाले आहेत.