मुंबई : 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर विभूती शंकर ढौंडियाल (Major Major Vibhuti Shankar Dhoundiyal) यांची पत्नी निकिता कौल शनिवारी भारतीय सैन्यात दाखल झाली. निकिता कौल भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुज्जू झाल्या आहेत. त्यांनी आज मेजर विभूती शंकर ढौंडियाल यांचाच गणवेश परिधान करून श्रद्धांजली वाहिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या पतीच्या हुतात्म्याबद्दल निकिता म्हणाल्या होत्या की, विभूच्या मार्गावर चालणे आणि त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हे माझे काम आहे आणि अशाच प्रकारे मी त्यांना श्रद्धांजली वाहू इच्छिते. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) परीक्षा आणि सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) ची मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर निकिता कौल गेल्या वर्षापासून चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत होत्या.


सन 2019 मध्ये न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत निकिता कौल यांनी म्हटलं होतं की, सहानुभूती दाखवू नये तर मजबूत व एकजूट होण्याचे आवाहन त्यांनी भारतीयांना केले होते. 'मी सर्वांना विनंती करते की सहानुभूती दाखवू नये तर खूप खंबीर राहा कारण हा माणूस (व्ही. एस. धौंडियाल) आपल्यापैकी इथे उभे असलेल्यांपेक्षा मोठा आहे. या माणसाला सलाम करुया. जय हिंद.'


विशेष म्हणजे सन 2019 मध्ये 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यात 40 सैनिक शहीद झाले होते. दहशतवादी हल्ल्यानंतरच सैन्याने पुलवामाच्या पिंगलान गावात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम सुरू केली. या कारवाईत मेजर रँक अधिकारी विभूती शंकर ढौंडियाल यांच्यासह दहशतवाद्यांच्या गोळीबारात चार सैनिक ठार झाले.


मेजर विभूती शंकर ढौंडियाल यांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांची पत्नी निकिता कौल म्हणाल्या होत्या की, त्यांना आपल्या पतीचा अभिमान आहे. आपल्या पतीला अभिवादन करताना त्यांनी म्हटलं होते. की, 'तू माझ्यावर खूप प्रेम करतो. हे तू माझ्याशी खोटे बोललास. कारण तू माझ्यापेक्षा आपल्या देशावर अधिक प्रेम करतोस आणि मला त्याचा अभिमान आहे.'


'तू एक शूर माणूस आहेस. माझा नवरा म्हणून मला तुमचा मोठा सन्मान वाटतो. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यावर प्रेम करेन. माझे जीवन तुमचे ऋणी आहे. हा ही दुखाची गोष्ट आहे की, तुम्ही मला सोडून जात आहात. मला माहित आहे की तुम्ही नेहमी माझ्या सोबत आहात.'