Maruti 800 Car : मारुती 800 (Maruti-800) कार आता रस्त्यावर क्वचितच दिसतात. पण एक काळ असा होता जेव्हा भारतीय कार बाजारात (Indian Car Market) मारुती 800 कारचा बोलबाला होता. ही छोटी हॅचबॅक कार त्या काळातील सर्वात यशस्वी कार होती. त्यावेळी आपल्याकडे मारुती 800 कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असायचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

39 वर्षांपूर्वी म्हणजे 1983 मारुती सुझुकी कंपनीने मारुती 800 कार लाँच केली. ही कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याला कारण आहे मारुती 800 ची पहिली कार मारुती कंपनीच्या मुख्यालयात (Maruti HQ) प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. 


39 वर्षांपूर्वी पहिली कार लाँच
मारुती सुझुकीच्या (maruti suzuki) हरियाणा (Haryana) इथल्या मुख्यालयात ही पहिली कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे 75 वर्षांपूर्वी भारताने स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिलं पाऊल टाकलं त्याचप्रमाणे मारुती सुझुकीने पहिली मारुती-800  कार 39 वर्षांपूर्वी लाँच केली होती. मारुती सुझुकी इंडियाचे सेल्स आणि मार्केटिंगचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी या कारबद्दल माहिती दिली.


या किंमतीत झाली होती विक्री
पहिली मारुती-800 कारची त्यावेळी 47 हजार रुपयांना (Maruti-800 Price) विक्री झाली होती. हरियाणाच्या मारुती उद्योग लिमिटेडमध्ये पहिल्या कारची निर्मिती झाली होती. या कंपनीला आता मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या नावाने ओळखलं जातं. मारुती 800  भारतात 2004 पर्यंत सर्वाधिक विकली जाणारी कार होती. 



2010 नंतर कंपनीने या कारचं उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. याचं कारण म्हणजे मारुती 800 च्या जागी मारुती ऑल्टोला (Maruti Alto) लोकप्रिय करायचं होतं. 18 जानेवारी 2014 ला मारुती-800 कारची निर्मिती पूर्णपणे बंद करण्यात आली.


दिल्लीतल्या नागरिकाने घेतली होती पहिली कार
पहिली मारुती-800 कार नवी दिल्लीत राहणाऱ्या हरपाल सिंह (Harpal Singh) यांनी खरेदी केली होती. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी आपल्या हाताने या कारची पहिली चावी हरपाल सिंह यांना सोपवली होती. या कारचा नंबर DIA 6479 असा होता. मारुती सुझुकी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार भारतात मारुती 800 कारची 27 लाखाहून अधिक विक्री झाली.