मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माण करणारी कंपनी मारूती कुणाला गिफ्ट देईल तर तुमच्या डोक्यात पहिलं काय येईल. आपल्याला काय वाटेल कार कंपनी कुणालाही कारच गिफ्ट करेल पण तसं झालं नाही. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मारूती सुझुकी इंडिया लिमिटेडने गुजरातमध्ये मेहसानाच्या हंसलपुर गावात गावकऱ्यांना इंटीग्रेटेड वॉटर सप्लाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मारूतीने ग्राम पंचायत आणि स्थानिक लोकांच्या मदतीने ही सुविधा डिझाइन केली आहे. याकरता 3.3 करोड रुपये लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


520 घरांना मिळणार शुद्ध पाणी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता हंसलपुर गावातील 520 घरातील लोकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातील 520 घरात जवळपास 2800 लोक राहतात. या सुविधेच्या अंतर्गत अंडरग्राऊंड स्टोरेज टँक तयार करण्यात आले आहेत. ओव्हर हेड वॉटर सप्लाय टँक आणि वॉटर पाइपलाइनच्या माध्यमातून हे पाणी पुरवलं जाणार आहे. 


6 किमीहून आणावं लागायचं पाणी 


या गावातील लोक 6 किमी दूर अंतरावरून पाणी घेऊन येत असतं. मात्र आता मारूती सुझुकी इंडियाने दिलेल्या या सुविधामुळे गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे मारूती सुझुकी या कंपनीने गावकऱ्यांचा हा प्रश्न सोडवला आहे.