नवी दिल्ली : मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा कट आखण्यात आल्याचे समोर आले आहे. अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम या सगळ्या कटामागे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लाँचिग पॅडवर मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांना एकत्रित करण्यात येत आहे. तर अफगाणिस्तानात या अतिरेक्यांना ट्रेनिंग देण्यात आले असून पाकिस्तानी सैन्य देखील या घुसखोरीसाठी मदत करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


'सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकवर शंका'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशवादी घोषित करणं ही बाब भारतासाठी गर्वाची असल्याचं मत केद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. इतर देशांचे याबाबतीत प्रयत्न सुरु होते. मात्र याला अडसर ठरत होतं ते चीन. अखेर चीननेसुध्दा मसूदविरोधात आपलं मत दिल्याने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. मात्र या अभिमानावेळी विरोधी पक्षांची साथ नसल्याची खंत यावेळी जेटलींनी व्यक्त केली. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकवर शंका व्यक्त केली जातेय, असे जेटली म्हणालेत.


याचा गवगवा कशासाठी?


भारतात दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचे षड्यंत्र उघडकीस आले आहे. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. आता बंदी घातल्यानंतर दहशतवादी गटाकडून घुसखोरीचा कट रचन्यात आल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. हा निर्णय भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय असल्याचे मानले जाते. मात्र, 'एमआयएम'चे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी याविषयी शंका उपस्थित केली आहे.


मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करू नये, यासाठी भारताने चीनशी कोणती तडजोड केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मसूद अजहर दहशतवादी घोषित झाल्याने भारताला काय मिळणार? २००८ साली हाफिज सईदला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही हाफिज सईद पाकिस्तानात जाहीर सभा घेतल्या नाही का? त्याच्या राजकीय पक्षाने निवडणूक लढवली नाही का? त्यामुळे मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्यात आले असले तरी त्याने फारसा फायदा होणार नाही. हे मोठे यश असल्याचा गवगवा गेला जात असला तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही, असे ओवैसी यांनी म्हटले.