मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दाखवलं औदार्य
सचिन तेडुलकरच्या या कृतीची दखल घेत, पंतप्रधान कार्यालयानं सचिन तेंडुलकरचे आभार मानले आहेत.
नवी दिल्ली : क्रिकेटचा देव आणि भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यानं खासदार म्हणून मिळणारं, वेतन तसंच भत्ते यांची रक्कम, पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे. राज्यसभा खासदार म्हणून सहा वर्षांच्या कार्यकाळातलं वेतन आणि इतर भत्ते, अशी एकंदर सुमारे 90 लाखांची रक्कम सचिन तेंडुलकरनं पंतप्रधान सहायता निधीसाठी दिली आहे. सचिन तेडुलकरच्या या कृतीची दखल घेत, पंतप्रधान कार्यालयानं सचिन तेंडुलकरचे आभार मानले आहेत.