नवी दिल्ली : राजसभेत सहारनपुर हिंसेवर बोलू न दिल्याने बसपाच्या अध्यक्षा मायावती आज रात्री राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.


काही वेळापूर्वी मायावतींनी राज्यसभेत म्हटलं की त्यांना जर बोलू नाही दिलं तर त्या राजीनामा देतील. मायावतींना सहारनपुर हिंसा प्रकरणी बोलायचे होते. परंतु सभागृहात त्याचा विरोध होत होता. तर सभापतींनी देखील त्यांना वेळ पूर्ण झाल्यानंतर थांबण्यास सांगितलं. याचा विरोध करत मायावती चांगल्याच भडकल्या. त्यानंतर त्यांनी म्हटलं की, जर बोलू नाही दिसलं तर राजीनामा देईल.