Joshimath Sinking : जोशीमठाबाबत केलेलं `ते` भाकीत खरं ठरतंय! 43 वर्षांपूर्वी काय सांगितलं होतं? जाणून घ्या
Joshimath Sinking : उत्तराखंडमधील जोशीमठ आणि भूस्खलनाच्या बातम्यांनी गेल्या काही दिवसात देशभरातील जनतेचं लक्ष वेधून घेतलं आहे. जोशीमठाला पौराणिक संदर्भ आहे. जोशीमठाला गेटवे ऑफ हिमालय म्हणजेच हिमालयाचं द्वार संबोधलं जातं. केदारनाथ, बद्रीनाथ धाम यात्रेतील महत्वपूर्व ठिकाण आहे.
Joshimath Sinking : उत्तराखंडमधील जोशीमठ आणि भूस्खलनाच्या (Joshimath Landslide) बातम्यांनी गेल्या काही दिवसात देशभरातील जनतेचं लक्ष वेधून घेतलं आहे. जोशीमठाला पौराणिक संदर्भ आहे. जोशीमठाला गेटवे ऑफ हिमालय म्हणजेच हिमालयाचं द्वार संबोधलं जातं. केदारनाथ, बद्रीनाथ धाम यात्रेतील महत्वपूर्व ठिकाण आहे. जोशीमठाला ज्योर्तिमठ असं संबोधलं जातं. बद्रीनाथ राजमार्गवर ( Badrinath Mahamarg) बनलेल्या या जोशीमठाची स्थापना हजारो वर्षांपूर्वी पहिल्या शंकराचार्य यांनी केली होती. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व पाहता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) या परिस्थितीचा आढावा घेतला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) यांनी फोन करून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण जोशीमठ परिसरात नेमकं काय होत आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आता याबाबत एक करत काही खुलासे समोर येत आहेत. 43 वर्षांपूर्वी केंद्र सरकारने गढवालच्या तत्कालीन कलेक्टर एमसी मिश्रा (M C Mishra) यांनी जोशीमठ का खचत आहे? याबाबत आढावा घेण्यास सांगितलं होतं. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली 18 सदस्यीय समितीने अभ्यास करून एक अहवाल सादर केला होता. यामध्ये जोशीमठ जुन्या भूस्खलन स्थानावर स्थित असल्याचं सांगितलं होतं. तसेच या भागात विकास कामे सुरु केल्यास खचू शकतो असं सांगण्यात आलं होतं. अहवालानुसार जोशीमठाचं बांधकाम थांबवा अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असं सांगितलं होतं. मात्र या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याने आता ही परिस्थिती ओढावल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 43 वर्षांपूर्वी या अहवालात काय सांगितलं होतं जाणून घेऊयात...
1976 साली सादर केलेल्या मिश्रा समिती अहवालात काय होतं?
जोशीमठ प्राचीन भूस्खलित जागेवर स्थित आहे. म्हणजेच ही जागा स्वयंभू पर्वत नसून रेती आणि दगडांच्या ढिगाऱ्यावर आहे. अलकनंदा आणि धौली गंगा नदी या ठिकाणी भूस्खलनास कारणीभूत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बांधकामं आणि लोकसंख्या वाढल्यास भूस्खलनास वेगाने होऊ शकतं.
जोठीमठ परिसर वाड्या वस्तींसाठी योग्य जागा नाही. रेती आणि दगडांचा ढिगारा पाणी शोषून घेते. त्यामुळे माती आणि दगडांच्या नैसर्गिक गुहा निर्माण झाल्या आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे माती वाहून जात आहे.
या भागात होणाऱ्या बांधकामावर निर्बंध लावणं गरजेचं आहे. मातीची भारवहन क्षमता आणि जागेची पाहणी केल्यावरच निर्माण कार्यास परवानगी द्यावी. खोदकामास पूर्णपणे निर्बंध लादावा.
रस्त्यांच्या निर्मितीसाठी डोंगर पोखरणे असो की स्फोटकांनी वाट मोकळी करण्याचा प्रयोग असो, यामुळे संकट ओढावू शकते. यामुळे भूस्खलन होऊ शकतं.
बातमी वाचा- Vistara Sale : विमान प्रवास करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, 'ही' कंपनी देणार स्वस्तात तिकीट
भूस्खलन क्षेत्रातील झाडं तोडल्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकतो. भूस्खलन रोखण्यासाठी मारवाडी आणि जोशीमठा दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं पाहीजे.
या भागातील पाण्याचे झरे आणि वेग पाहता भूस्खलन रोखण्यासाठी काँक्रीट ड्रेनेज सिस्टीम आखणं गरजेचं आहे. एकाच पाणी साठू नये यासाठी योजना आखावी. नदीकाठची धूप रोखण्यासाठी कमकुवत ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक टाकावेत.
नुकतंच सरकारने आठ सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार सर्वाधिक नुकसान झालेल्या भागातील घरे पाडून राहण्यायोग्य ठिकाणी स्थलांतरित करावी. या ठिकाणच्या लोकांना प्राधान्याने स्थलांतरित करावे.