नवी दिल्ली : विरंगुळा म्हणून तास न तास मॅकडोनाल्डसमध्ये बसून बर्गर खाणाऱ्यांना आता दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. कारण भारतातील मॅकडोनाल्डसची १६९ रेस्टॉरन्ट बंद होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामूळे मॅकडोनाल्डशी संबधीत असलेल्या हजार कर्माचाऱ्यांवरही बरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.


मॅकडोनाल्डस इंडियाने कनॉट प्लाझा रेस्टॉरन्ट लिमिटेड (सीपीआरएल) बरोबरचे सर्व व्यावसायिक करार रद्द केल्याने उत्तर आणि पूर्व भारतातील ही रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


सीपीआरएलमध्ये मॅकडोनाल्डचीही भागीदारी आहे. या कंपनीचा आणि मॅकडोनाल्डस इंडियाचा गेल्या काही वर्षापासून वाद सुरू होता.


दरम्यान कनॉट प्लाजा रेस्टॉरन्ट लिमिटेड (सीपीआरएल)ने अटींचा भंग केला होता. यामूळे नुकसानाला सामोरे जावे लागले होते.


ही नुकसान भरपाई देण्यास कसूर केल्याने मॅकडोनॉल्डस इंडियाने सीपीआरएल सोबतचे सर्व व्यावसायिक करार रद्द केल्याचे सांगितले जात आहे.


मॅकडोनाल्डसने सीपीआरएलला १५ दिवसाची नोटीस दिली असून त्यानंतर त्यांना कंपनीचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही.