Mental Health : हल्लीचे दिवस इतके धकाधकीचे आहेत की, प्रच्येकाच्याच तोंडी 'अरे मला माझ्यासाठीच वेळ मिळत नाही...' असं म्हणताना दिसत आहे. बहुधा तुम्ही आम्हीही त्यापैकीच एक आहोत. सततचे Targets, कामाचा वाढता व्याप, आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष आणि एक ध्येय्य साध्य होत नाही तोच दुसरं वाढीव ध्येय्य घेऊन उभे असणारे वरिष्ठ..... या साऱ्यामध्ये भरडले जातात ते म्हणजे सर्वसामान्य कर्मचारी. ही जवळपास प्रत्येक कंपनीत काम करणाऱ्या Employees ची कैफियत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरं काम कितीही केलं तरी सुट्टी मागायला गेल्यानंतर (Boss) बॉसचा कारल्याचा रस प्यायल्याप्रमाणे पाहायला मिळणारा खट्टू चेहराही आलाच. या साऱ्याचा आपल्या कर्मचाऱ्यांना सामना करावा लागू नये यासाठी एका लोकप्रिय E- Commerce कंपनीनं अफलातून शक्कल शोधून काढली आहे. 


ही कंपनी आहे, Meesho. नुकतीच Meesho चर्चेत आली ती म्हणजे कंपनीकडूनच जाहीर करण्यात आलेल्या Reset Break मुळे. कंपनीचे संस्थापक आणि CTO संजीव बरनवाल यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली. 


अधिक पाहा : Amazon - flipkart वर Offers ची दिवाळी, पाहा स्वस्तात काय काय मिळतंय...


 


कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य (Mental health) केंद्रस्थानी ठेवत त्यासाठी नोकरीच्या ठिकाणीही योग्य ते संतुलन राखलं जाणं गरजेचं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. 'आम्ही सलग दुसऱ्या वर्षी 11 दिवसांच्या ब्रेकची घोषणा केली आहे', असं म्हणत कंपनीतील कर्मचारी 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत स्वत:ला रिसेट आणि रिचार्ज करण्यासाठी वेळ काढतील असंही त्यांनी जाहीर केलं. 


असा निर्णय घेण्याची कंपनीची ही पहिलीच वेळ नाही... 
इनफाइनाइट वेलनेस लीव (Infinite wellness leave), 30 आठवड्यांसाठीची जेंडर न्यूट्रल पॅरेंटल लिव्ह अशा अनेक नवनवीन संकल्पना फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांच्या हितासाठी राबवल्या आहेत. याच Policies मुळे ही कंपनी सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. इतकी, की अनेकजण या सुविधांची यादी पाहून कंपनीत नोकरीची संधी आहे का हेच चाचपताना दिसत आहे. 



सोशल मीडियावर (Social Leave) मीशोच्या या मोठ्या सुट्टीचं ट्विट व्हायरल होताच अनेकांनीच त्याची तुलना आपल्या कंपन्यांशी केली आहे. 'रुलाओगे क्या...' असं म्हणत काहींनी आपल्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर, काहींनी तर हे ट्विटच थेट आपल्या बॉसपर्यंत कसं पोहोचेल याची व्यवस्थाही केली आहे. तुमच्या कंपनीत या ट्विटमुळं सध्या नेमकं कसं वातावरण आहे?