नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक झाली. या आंदोलनावर पहिल्यांदाच मोदी आणि मंत्र्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीला अमित शाह, राजनाथ सिंग, नरेंद्र सिंग तोमर, पियूष गोयल उपस्थित होते. त्यानंतर आता शेतकरी संघटना सोबत बैठक होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच आहे. दुपारी अडीच वाजता सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये पाचव्या फेरीतील चर्चा होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे बैठकीत उपस्थित आहेत. 


मोदी सरकारचे मंत्री शेतक-यांशी वारंवार चर्चा करत आहेत, परंतु पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रथमच रणनीती आखली जात आहे. या बैठकीस उपस्थित जाण्यापूर्वी कृषिमंत्री नरेंद्र सिंह यांनी सरकार सकारात्मक असून शेतकरी आंदोलन संपवतील अशी आशा असल्याचं सांगितलंय.