नवी दिल्ली : जगभरात आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असताना, भाजप खासदार सोनल मानसिंग यांनी राज्यसभेत आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही साजरा करावा अशी मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने 1977 मध्ये अधिकृतपणे मान्यता दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रथम उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये साजरा होऊ लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज महिला दिनानिमित्त राज्यसभेत बोलताना प्रख्यात शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंग म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही साजरा करावा अशी माझी मागणी आहे. त्यांच्या या मागणीने सभागृहात एक हास्याचं वातावरण निर्माण झालं. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही तरीही समानतेबद्दल बोलत आहोत.



आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस 19 नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. याबाबत सकारात्मक भूमिका नमूद करण्यासाठी आणि पुरुषांच्या चांगल्या गोष्टींबाबत जागरूकता निर्माण करावी. हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या उत्सवांमध्ये सूचीबद्ध आहे.


या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा विषय आहे "महिला नेतृत्व : कोविड -19 च्या जगात समान भविष्य"


यूएन वूमनने म्हटले आहे की, कोविड -19 विरुद्धच्या लढाईत महिला आघाडीवर आहेत, तरीही त्यांना जागतिक पातळीवर पुरुषांच्या तुलनेत ११ टक्के कमी वेतन मिळते.


आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 रोजी यूएन महिला कार्यकारी संचालक फुम्झिले मॅलाम्बो-एनगकोका म्हणाल्या की, महामारीच्या वेळी महिला आणि मुलींवरील वाढती हिंसाचार तसेच शाळा सोडण्याचे प्रमाण, काळजी, जबाबदाऱ्या आणि बालविवाहाचे प्रमाण वाढल्यामुळे मुलींचे शिक्षण गमावले आहे.'