नवी दिल्ली : बहुचर्चीत गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. पण, प्रचारादरम्यान उडालेला आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा अद्यापही खाली बसायचे नाव घेताना दिसत नाही.


राहुल गांधींनी सांगितले तरी माफी मागणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधील वडगाममधून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले जिग्नेश मेवामई यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. तसेच, आपल्या विधानांवर ते ठामही आहेत. इतकेच नव्हे तर, त्यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असून, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले तरी, आपण माफी मागणार नाही, असे ठासून सांगितले आहे.


मोदींनी हिमालयात जाऊन आपला वृद्धापकाळ साजरा करावा


निवडून आल्यावर जिग्नेश मेवाणी यांनी एका वृत्तवाहीनीला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान, जिग्नेश यांनी मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गुजरातमध्ये भाजपच्या जागा घटल्या आहेत. 2019साठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता म्हातारे झाले आहेत. त्यांनी हिमालयात जाऊन आपला वृद्धापकाळ साजरा करावा. दरम्यान, या विधानानंतर मेवाणी यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. मात्र, आपण आपल्या विधानावर ठाम असून, कोणत्याही स्थितीत माफी मागणार नसल्याचे ठासून सांगितले. अगदी राहुल गांधी यांनीही सांगितले तरी आपण माफी मागणार नल्याचे ते म्हणाले.


गुजरातमध्ये मोदी, शहांच्या अहंकाराचा भांडाफोड झाला


गुजरातमध्ये भाजपच्या जागा घटल्या याबाबत मेवाणी म्हणाले, 'मोदी आणि अमित शहा दावा करत होते की, गुजरातमध्ये आम्ही 150 जागा जिंकू. पण, त्यांच्या अहंकाराचा भांडाफोड झाला. हा आमच्या आंदोलनाचा विजय आहे. आम्ही सभागृहात आणि रस्त्यावरही आवाज उठवू, आंदोलन करू. तसेच, 2019मध्ये सत्ताधाऱ्यांना पराभूत करू', असा विश्वासही मेवाणी यांनी व्यक्त केला.