नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्यापूर्वी सुरक्षेच्या मुद्दयावरील एका मोठ्या कराराला मंजुरी मिळाली आहे. सुरक्षेच्या मुद्द्यांसाठी स्थापलेल्या समितीने भारतीय नौदलाला आणखी सबळ करण्यासाठी २४ बहुउपयोगी MH-60 रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर खरेदी करण्याची मंजुरी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MH-60 या हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी तब्बल २६० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचं कळत आहे. हा रोमिओ जमीन आणि पाण्यातही मारा करण्यासाठी सक्षम असल्यामुळे भारतीय सुरक्षा दलांंच्या क्षमते आणखी वाढ होणार आहे. 



या बलाढ्य रोमिओची वैशिष्ट्ये


- MH-60 रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर पाणबुड्यांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम -आहे. 


- समुद्रातील शोधमोहिमेमध्येही या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार आहे. 


- शत्रूच्या जहाजांचा शोध घेत त्यांच्याकडून येणारा हल्ला परतवून लावण्याचीही क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. 


- MH-60मध्ये अद्ययावत कार्लप्रणाली, क्षेपणास्त्र आणि टॉरपीडो अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. 


- सध्याच्या घडीला अमेरिकेच्या नौदलामध्ये हे हेलिकॉप्टर रुजू आहे. 


- भारतीय संरक्षण दलांच्या दृष्टीने विचार केल्यास, हे हेलिकॉप्टर एँटी सबमरीन आणि एँटी सरफेस वेपनच्या रुपात तैनात आहे. 


- जगभरातील नौदलांमध्ये महत्त्तवाची भूमिका निभावणारं हे हेलिकॉप्टर रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाचाही एक भाग आहे. या अद्ययावर कार्यप्रणावर आधारित अशा हेलिकॉप्टरची वैशिष्ट्य पाहता भारताच्या दृष्टीने शत्रूचा अचूक लक्ष्यभेद करण्य़ास ते फायद्याचं ठरेल असं म्हणायला हरकत नाही.