Mi-17V-5 : जगातील 60 देशांत या सीरीजच्या 12 हजारपेक्षा जास्त हेलिकॉप्टरचा वापर
देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टरअपघातात काल बुधवारी निधन झाले. आज जगात 60 देश Mi-17V-5 या मालिकेतील 12 हजारहून अधिक हेलिकॉप्टर वापरत करत आहेत.
नवी दिल्ली : Bipin Rawat Helicopter crash : देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर अपघातात ( Helicopter crash) काल बुधवारी निधन झाले. जनरल बिपिन रावत ज्या हेलिकॉप्टरमध्ये होते ते हेलिकॉप्टर अत्याधुनिक होते. आज जगात 60 देश Mi-17V-5 या मालिकेतील 12 हजारहून अधिक हेलिकॉप्टर वापरत करत आहेत. त्यात चीन, श्रीलंका आणि इंडोनेशियासारखे देश आहेत. कारण जगातील सर्वात अत्याधुनिक हेलिकॉप्टरमध्ये या गणना होते. मात्र, या हेलिकॉप्टर अपघात (Coonoor Army Helicopter Crash) झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
VVIP हेलिकॉप्टरचे काय आहे वैशिष्ट्य
ताशी 250 किलोमीटर वेगाने उड्डाण करणारे हे हेलिकॉप्टर कठीण परिस्थितीत आणि खराब हवामानातही काम करू शकते. लँडिंगसाठी हेलिपॅडची गरज नाही. ते खडबडीत ठिकाणी सहजपणे उतरू शकते आणि तेथे मदत देखील देऊ शकते. याचा वापर वाहतूक, बचाव कार्य, शोध मोहिम, रेस्क्यू ऑपरेशन आणि VVIP व्यक्तीसांठी केला जातो आणि एका वेळी 3 Crew Members व्यतिरिक्त 36 लोक यात बसू शकतात. याशिवाय हे हेलिकॉप्टर जास्तीत जास्त 13 हजार किलो वजन उचलू शकते.
या हेलिकॉप्टरचा कमाल वेग 250 किमी प्रतितास आहे. तर 6000 मीटर उंचीपर्यंत पर्वतीय आणि दुर्गम भागातही हे हेलिकॉप्टर उड्डाण करण्यास सक्षम असते. एकदा इंधन भरल्यानंतर MI-17V5 तब्बल 580 किमी अंतर कापू शकते. अत्यंत कठीण परिस्थितीतही हे हेलिकॉप्टर उड्डाण करु शकते आणि ते लॅंडही होऊ शकते.
हे हेलिकॉप्टर अत्याधुनिक
हे हेलिकॉप्टर इतके अत्याधुनिक आहे की, ते महत्वांच्या व्यक्तींसाठी आणि सैन्य दलासाठी वापरले जाते. देशांतर्गत उड्डाणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टर वापरतात. याशिवाय लष्करातील व्हीव्हीआयपी कामगिरी आणि व्यक्तींसाठी हे हेलिकॉप्टर वापरले जाते. भारताकडे सध्या रशियाने निर्मित एमआय सीरिजची 150 हेलिकॉप्टर आहेत. हे हेलिकॉप्टर जास्त जुने नव्हते. ही सर्व हेलिकॉप्टर भारताला 2011 ते 2018 नंतर मिळाली आहेत.