अम्फान चक्रीवादळाचा धोका : ओडिशा, पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द
`अम्फान` चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने मंगळवारी जाहीर केले की पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी तीन श्रमिक स्पेशल गाड्या २१ मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई : 'अम्फान' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने मंगळवारी जाहीर केले की पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी तीन श्रमिक स्पेशल गाड्या २१ मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 'अम्फान' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने मंगळवारी गाड्या रद्द करत आल्याची घोषणा केली. पुढील काही दिवसांत गाड्या पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकारला पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मान्यता मिळाली आहे.दरम्यान,पश्चिम बंगालला एक रेल्वे आणि दोन गाड्या किनारपट्टी ओडिशासाठी पाठविण्याचे ठरविले गेले होते. परंतु आम्हाला उष्णकटिबंधीय चक्रीवादळ 'अम्फान'च्या धोक्याची माहिती मिळाल्यानंतर या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांनी सांगितले.
पूर्व किनार पट्टीला अम्फान या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळाच्या या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन परप्रांतीय मजुरांना घेवून जाणाऱ्या श्रमिक रेल्वे सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. २१ मेपर्यंत ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विविध ठिकाणाहून श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहेत. या श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून सुमारे चार लाख श्रमिकांना विविध राज्यात सुरक्षित पोहोचविण्यात आले आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेल्या अम्फान या वादळामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन या राज्याकडे जाणाऱ्या मजुरांनी गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व उपाययोजना करुन श्रमिक रेल्वेद्वारे आजतागायत उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू या राज्यात सुमारे चार लाख श्रमिकांना सुरक्षित पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांनी दिली आहे.