गुजरात : सुरतमध्ये हजारो हातावर पोट असलेले स्थलांतरीत कामगार गावी जाण्याची मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले. शिवाय यावेळी ते पागाराची मागणी करताना देखील दिसले. याठिकाणी कामगारांनी मोठ्या  प्रमाणात हिंसाचार देखील घडवून आणला. शुक्रवारी रात्री  झालेल्या हिंसाचारात कामगारांनी हातगाड्यांची तोडफोड केली त्याचप्रमाणे दुकानांची आणि सार्वजनिक संपत्तीचंही मोठं नुकसान केलं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे देशातील सर्वच कंपन्या बंद आहेत. परिणामी रोजंदारीवर काम करणारे कामगार आपल्या पगाराची आणि गावी परतण्याची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. घटनेची माहिती कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी ८० कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



'याठिकाणी कामगारांनी अनेक रस्ते बंद करून दगड फेक देखील केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ६० ते ७० लोकांना ताब्यात घेत कारवाई केली. हे सर्व लोक आपल्याला पुन्हा घरी पाठवण्याची सोय करावी अशी मागणी करत असल्याची माहिती डीसीपी राकेश बारोत यांनी दिली आहे.


देशभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडल आहे. आतापर्यंत राज्यात १५७४ लोकांना कोरोनाची लागणी झाली आहे. तर ११० कोरोनाबाधित रूग्णांचा बळी गेला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मुंबईत १००८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर यामध्ये ६४  लोकांचा बळी गेला आहे.