Puncture Wala was Crorepati: ही बातमी आहे एका करोपडपती पंक्चरवाल्याची. अलिशान बंगला, शोरुम आणि करोडो रुपयांचा बँक बॅलेन्स. आता इतका करोडपती व्यक्ती टायरचं पंक्चर काढण्याचं काम करत असेल यावर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. उत्तर प्रदेशमधल्या बरेलीत एक करोडपती पंक्चरवाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायरचं पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीची लक्झरी लाईफस्टाईल पाहून पोलीसही हैराण झाले. आणि त्यांनी या व्यक्तीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. पंक्चर काढण्याच्या व्यवसायात इतका पैसा कसा कमवू शकतो, हा प्रश्न पोलिसांना पडला. पण जेव्हा खरं कारण समोर आलं तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.


अशी करत होता कमाई
पंक्चर करणाऱ्या या व्यक्तीचं नाव इस्लाम खान असं असून तो अशिक्षित आहे. बरेलीमधल्या दिल्ली-लखनऊ हायवेवर त्याचं टायर पंक्चरचं छोटसं दुकान आहे. या कामातून त्याला काही पैसे मिळत होते. त्यावरच त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरु होता. यादरम्यान तो कुख्यात तस्कर नन्हे लंगड्याच्या संपर्कात आला. 


यानंतर तो नन्हे लंगड्यासाठी काम करु लागला. पंक्चर दुकानाच्या आडून त्याने ड्रग्सची तस्करी सुरु केली. यासाठी त्याला चांगला पैसा मिळू लागला. याच पैशातून त्याने अलिशान बंगला आणि दुचाकीचं शोरुम विकत घेतलं. त्याने तब्बल 7 कोटींची मालमत्ता जमवली. सर्व संपत्ती त्याने पत्नी आणि मुलाच्या नावावर केली होती. 


त्याची लक्झरी लाईफस्टाईल पाहून पोलिसांना संशय आला. त्यांनी इस्लाम खानवर नजर ठेवली. एकेदिवशी ड्रग्स तस्करी करताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं आणि या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणी अधिक तापस करत आहेत.