अलवर : आपण अनेकदा नेत्यांना मागून नावे ठेवतो. राज्यकर्त्यांना शिव्यांची लाखोली वाहतो. मात्र समोर असे बोलायला सहसा कोणी धजावणार नाही. असाच काहीसा प्रकार झाला.


काय आहे हे प्रकरण ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानचे कॅबिनेट मंत्री हेम सिंग भडाना यांच्या मुलाने आणि मित्रांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ती व्यक्ती अत्यंत गंभीर असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


या संबंधित पीडीत व्यक्तीच्या वडीलांनी सांगितले की, काही अज्ञात लोक मंत्र्याबद्दल अपशब्द वापरत होते. त्यावेळेस त्यांचा मुलगा देखील तिथेच उभा होता. मंत्र्याच्या मुलाने या लोकांचे बोलणे ऐकले आणि भडकला. ते पाहून इतर लोक पळाले. मात्र त्यांचा मुलाला त्यांनी पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली.  आम्ही सोडवायला गेल्यावर आम्हाला देखील धमकवण्यात आले. 




 


पोलिसांचे मौन


या सर्व प्रकारावर स्थानिक पोलीसांनी मौन पाळणे पसंत केले आहे. या घटनेची एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल.