मुंबई  : देशात वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. महाराष्ट्र सरकारने 25 वर्षांपासून पुढील सर्वांना लस देण्याची मागणी केली. तर काही राज्यांकडून 18 वर्षांपासून सर्वांना लस देण्याची मागणी केली आहे. मात्र, ही मागणी असली तरी लसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाने सर्व लोकांना लसीकरण केले जाणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीकरणाची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त लोकांना लस उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी राज्य सरकारांकडून सातत्याने केली जात आहे. त्याला प्रतिसाद म्हणून केंद्र सरकारने हे स्पष्ट केले की, लसीकरण ज्यांना  करावयाचे आहे त्यांच्यासाठी नाही, तर लोकांचे प्राण वाचविण्याचे उद्दीष्ट आहे आणि ज्या लोकांना सर्वात जास्त आवश्यक आहे त्यांना प्रथम ही लस दिली जाईल.


प्रत्येकाला लस मिळेल का?


आयएमएने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीकरणाचे वय 18 करण्याची मागणी केली आहे. सध्या देशात ज्यांनी वयाच्या 45 व्या वर्षी ओलांडले आहेत, त्यांना लस देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा आरोग्य मंत्रालयाच्या अधिका्ऱ्यांना विचारले गेले की, सरकार लसीकरणाची वयोमर्यादा बदलणार आहे का? त्याला उत्तर म्हणून अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही लस कुणाच्या इच्छेनुसार देता येत नाही, उलट लोकांचे प्राण वाचविणे ही लस देण्याचे उद्दीष्ट आहे आणि ज्याला याची गरज भासते त्यालाच लस दिली जाऊ शकते.


मृत्यू टाळणे हा लसीकरणाचा उद्देश 


आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, संपूर्ण जगात या विषयावर सखोल चर्चा झाली आहे. जेव्हा जेव्हा लसीकरण होते तेव्हा त्यांची पहिली समस्या म्हणजे लोकांची वाचवणे होय. दुसरे उद्दिष्ट आरोग्य यंत्रणेकडून सातत्याने नवनवीन दुरुस्ती करणे आहे.भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह या देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आजही ब्रिटनमध्ये लोकांना प्रत्येक वयासाठी लस लागू करण्याची परवानगी नाही. त्याचवेळी अमेरिकेत ही लस वय आणि आवश्यकतेनुसार दिली गेली आहे. फ्रान्समध्ये असेही म्हटले गेले होते की जास्त जोखीम असलेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त लोकांना लस दिली जाईल.


मंत्रालयाने असेही म्हटले आहे की स्वीडनमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त व ऑस्ट्रेलियात 70 वर्षांवरील लोक लस घेत आहेत. त्याच वेळी, जगात लसीकरण चालू आहे, मात्र अशा इतर काही श्रेणी आहेत. अशा परिस्थितीत, देशातील लसीकरण मोहीमदेखील योजनेनुसार चालविली जात आहे.


आतापर्यंत 8 कोटी लोकांचे लसीकरण


कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे लसीकरणातही वेग आला आहे. गेल्या 24 तासांत 43 लाखाहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले, जे एका दिवसात दिलेल्या डोसच्या बाबतीत सर्वाधिक आहे. मंगळवारपर्यंत आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण 8,31,10,926 लसचे डोस देण्यात आले आहेत.


आतापर्यंत दिलेल्या एकूण लसपैकी 60 टक्के महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सकाळी 7 वाजेपर्यंत लसीकरण मोहिमेच्या 80 व्या दिवशी एकूण, 43,00,966 डोस देण्यात आले, त्यापैकी 39,00,505 लाभार्थ्यांना प्रथम डोस देण्यात आला आणि 4,00,461 लाभार्थ्यांना दुसरा देण्यात आला डोस.