नीमराना : अल्वर जिल्ह्यातील नीमराना येथील विजय बाग परिसरातील एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत वडिल आपल्या मुलीला मारहाण करत असल्याचे दिसतेय. मात्र जसे वडील काही सेकंदासाठी मागे सरकतात मुलगी अचानक उठते आणि छतावरुन उडी घेते. काही कळण्याच्या आतच हे सारे घडते. छतावरुन उडी मारल्याने मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.


रुग्णालायत भर्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१२ वर्षांची ही मुलगी असून तिला उपचारासाठी रुग्णालायत दाखल करण्यात आलेय. मुलीने वडील आणखी मारतील या भितीने छतावरुन उडी घेतली. 


शेजारच्या छतावरुन बनवला व्हिडीओ


या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शेजारच्या छतावरुन बनवण्यात आला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलाय. दरम्यान ही मुलगी जीवन-मृत्यूच्या दाढेत अडकलीये.


व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा


या कारणाने वडिलांनी केली मारहाण


ही मुलगी छतावर उभी राहून कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होती. यावेळी पीडित मुलीचे वडील संतोष यांनी ते पाहिले आणि त्यांना संताप अनावर झाला. त्यानंतर त्यांनी जोरजोरात मारहाण सुरु केली.


दारुच्या नशेत होते वडील


वडिलांच्या मारहाणीमुळे मुलगी जोरजोरात ओरडत होती. तिचे ओऱडणे ऐकून आजूबाजूचे सर्व लोक गोळा झाले. यावेळी घाबरलेल्या मुलीने छतावरुन उडी मारली. दरम्यान वडिल यावेळी नशेत होते असा आरोप केलाय.